मिठाई व चिवड्याला भाववाढीची फोडणी किलोमागे २० रुपये वाढ : हरभरा डाळीच्या दरवाढीचा परिणाम
By Admin | Updated: October 22, 2016 00:43 IST2016-10-22T00:43:54+5:302016-10-22T00:43:54+5:30
जळगाव : वसुबारसने दीपोत्सवाला सुरुवात होत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या निमित्ताने घरात फराळ व मिठाई तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. हरभरा डाळीच्या भाववाढीमुळे यावर्षी फरसाणाच्या किमतीत किलोमागे २० रुपयांची दरवाढ आहे.

मिठाई व चिवड्याला भाववाढीची फोडणी किलोमागे २० रुपये वाढ : हरभरा डाळीच्या दरवाढीचा परिणाम
ज गाव : वसुबारसने दीपोत्सवाला सुरुवात होत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या निमित्ताने घरात फराळ व मिठाई तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. हरभरा डाळीच्या भाववाढीमुळे यावर्षी फरसाणाच्या किमतीत किलोमागे २० रुपयांची दरवाढ आहे.फराळ तयार करून घेण्यावर भरदिवाळीच्या निमित्ताने शहरातील रिंगरोड, गणेश कॉलनी, पिंप्राळा, जुने जळगाव, महाबळ, मोहन नगर, रामानंद नगर, आदर्श नगर, आर.वाय.पार्क, कानळदा रोड, शिवाजी नगर, असोदा रस्ता या भागात फराळाचे साहित्य तयार करून देण्यासाठी आचार्यांनी दुकाने थाटली आहे. या ठिकाणी हॉटेल कारागिर ५० रुपये किलो दराने फरसान तयार करून देत आहेत. भेसळ टाळण्यासाठी गृहिणी फराळ तयार करून घेण्याला प्राधान्य देत आहेत.हरभरा दाळीच्या भाववाढीचा फटकागेल्यावर्षी हरभरा दाळ ५० ते ६० रुपये किलो होती. मात्र गेल्यावर्षी दुष्काळीस्थितीमुळे संपूर्ण हंगाम हातातून गेल्याने सर्वच दाळींचे भाव १५० ते २०० रुपयांच्या दरम्यान राहिले. हरभरा डाळ यावर्षी १५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. यासार्याचा फटका म्हणून फरसानाच्या किंमतीत किलो मागे २० रुपयांची वाढ झाली आहे.शंकरपाळे, सोहनपापडी, बालू शाहीचे भाव जैसे थे.हरभरा दाळीचा वापर होणार्या मिठाईच्या भावात देखील वाढ करण्यात आली आहे. मात्र शंकरपाळे, सोहनपापडी तसेच बाली शाहीचे दर मात्र यावर्षी कायम आहेत. काजूच्या भाववाढीमुळे काजूकतलीचे किलोचे भाव ५०० रुपयांवरून ७०० रुपयांवर पोहचले आहे. तर मावा मिठाई,मोतीचूर लाडू, मोहनथाल, मावामिक्स मिठाई खरेदीसाठी गर्दी होणार आहे.कारागिरांचा ओव्हर टाईमहॉटेलवरून किंवा तयार केलेले फरसाण घेण्यापेक्षा गृहिणी हॉटेल कारागिरांकडून फरसाण तयार करून घेण्यावर भर देत असल्याने शहरातील विविध भागात रात्रंदिवस फरसाण तयार करण्याचे काम सुरु आहे. काही ठिकाणी मंडप टाकून तर काही ठिकाणी शेड टाकून फरसाण तयार केले जात आहे. काही ठिकाणी तयार केलेल्या फरसाणाचे पाकीट विक्रीचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. काही नामांकित कंपन्यांनीदेखील फरसाणचे किलो, अर्धा किलो व दोन किलोचे पाकीट तयार करून विक्रीसाठी ठेवले आहेत.