अर्धापूर तालुक्यात पेरणीला सुरुवात
By Admin | Updated: June 17, 2015 01:33 IST2015-06-17T01:33:08+5:302015-06-17T01:33:08+5:30
अर्धापूर : तालुक्यात मृग नक्षत्राने सुरुवात केलेल्या चांगल्या पावसाने पेरणीला सुरुवात झाली असून सोयाबीन, हळद व कापसाच्या पेरण्याची शेतकर्यांत घाई झाली आहे़

अर्धापूर तालुक्यात पेरणीला सुरुवात
अ ्धापूर : तालुक्यात मृग नक्षत्राने सुरुवात केलेल्या चांगल्या पावसाने पेरणीला सुरुवात झाली असून सोयाबीन, हळद व कापसाच्या पेरण्याची शेतकर्यांत घाई झाली आहे़तालुक्यात आतापर्यंत ३९ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ तालुक्यात २०१५-१६ या वर्षात ज्वारी १७१० हेक्टर, तूर १२०० हेक्टर, मुग ६५० हे़, उडीद ३४६ हे़, कापूस ४ हजार हे़, ऊस ५ हजार, सोयाबीन ९ हजार हेक्टर असे एकूण २२ हजार २६० हेक्टरक्षेत्र अंदाजे पेरणीखाली राहील़ शेतकर्यांकडे सोयाबीनचे २६४८ क्विंटल बियाणे उपलब्ध असून ३५८१ क्विंटल नावनिहाय बियाणे पुरवठा होणार आहे़ ४५० ग्रॅम वजनाची २१ हजार २३९ पाकीटे कापूस वितरणाची आवश्यकता असताना आतापैकी ११ हजार ४४७ पाकीटे पुरवठा झाली आहेत़तालुक्यासाठी युरिया ४३७८ मे़टन, डीएपी ३३४८, म्युरेट ऑफ पोटॅश ११८५ मे़टन, सुपर फॉस्फेट १४८३ मे़टन, संयुक्त खते २६६८ मे़टन, इतर २३३ मे़ टन अशा एकूण १३२९२ मे़ टन खताची मागणी मे अखेरपर्यंत ४४२९ मे़टन खताचा पुरवठा झाल्याची माहिती पंचायत समितीच्या कृषी अधिकारी गार्गी स्वामी यांनी दिली़कोटतालुक्यातील ४० कृषी सेवा केंद्रात खत व बियाणे वाटप सुलभतेसाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली असून तालुका कृषी अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक कार्यरत आहे - बी़पी़ पाटील, मंडळ कृषी अधिकारी, अर्धापूऱ