शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

५५ टक्के तालुक्यांमध्ये नैऋत्य मान्सून वाढला, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरचे विश्लेषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 12:34 IST

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे २०१२ ते २०२२ या काळात देशभरातील ५५ टक्के तहसील क्षेत्र किंवा तालुक्यांध्ये नैऋत्य मोसमी ...

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे २०१२ ते २०२२ या काळात देशभरातील ५५ टक्के तहसील क्षेत्र किंवा तालुक्यांध्ये नैऋत्य मोसमी पावसात १० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली आहे.  स्वतंत्र विचार गट ‘द कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर’ने बुधवारी प्रसिद्ध झालेल्या नवीन अभ्यासामध्ये भारतातील ४,५००हून अधिक तालुक्यांसाठी ४० वर्षांच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले.

यात असे आढळले की, ११ टक्के तालुक्यांमध्ये नैऋत्य मान्सूनसात घट झाली आहे. कमी पावसाची नोंद करणारे तहसील पर्जन्य-आधारित गंगेच्या मैदानी प्रदेशात, ईशान्य भारत आणि उच्च हिमालयीन प्रदेशात आहेत, ही क्षेत्रे भारताच्या कृषी उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यामध्ये नाजूक परिस्थिती आहे. राजस्थान, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या पारंपरिकपणे कोरड्या प्रदेशात अभ्यास केलेल्या जवळपास एक चतुर्थांश तहसील क्षेत्रांत जून ते सप्टेंबर या कालावधीत ३० टक्क्यांहून अधिक पावसाची वाढ दिसून आली. 

यामुळे अचानक येताे पूर  अभ्यासात पावसाच्या नमुन्यातील बदलाचे श्रेय हवामान बदलाच्या वेगवान दराला दिले आहे. त्यात असेही आढळून आले की, या तहसीलमध्ये वाढलेली पर्जन्यवृष्टी ही वारंवार कमी कालावधीच्या, अतिवृष्टीच्या घटनांचा परिणाम आहे ज्यामुळे अनेकदा अचानक पूर येतो. उदाहरणार्थ, नैऋत्य मान्सूनमध्ये गेल्या दशकात (मागील ३० वर्षांच्या तुलनेत) ३१ टक्के तहसीलनी दरवर्षी चार किंवा अधिक दिवसांच्या मुसळधार पावसाची वाढ अनुभवली. भारतात ५२ टक्के निव्वळ लागवडीखालील क्षेत्र मान्सूनवर अवलंबून आहे.   या अभ्यासात असेही आढळून आले की, नैऋत्य मान्सूनमध्ये घट झालेल्या एकूण तालुक्यांपैकी ८७ टक्के, बिहार, उत्तराखंड, आसाम आणि मेघालयमध्ये वसलेल्या सुरुवातीच्या मान्सून महिन्यांत पावसात घट झाली, जे खरीप पिकांच्या पेरणीसाठी महत्त्वाचे आहे.

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसweatherहवामान