दाक्षिणात्य गझल गायक शिर्डीतून बेपत्ता

By Admin | Updated: June 6, 2015 00:11 IST2015-06-06T00:11:16+5:302015-06-06T00:11:16+5:30

शिर्डी : प्रसिद्ध दाक्षिणात्य गझल गायक एस़ विठ्ठलराव ऊर्फ विठ्ठलराव आत्माराम शिवपूरकर हे साई मंदिरातून बेपत्ता झाले आहेत़ याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी गुरुवारी शिर्डी पोलिसांत तक्रार दिली़

South Ghazal missing from singer Shirdi | दाक्षिणात्य गझल गायक शिर्डीतून बेपत्ता

दाक्षिणात्य गझल गायक शिर्डीतून बेपत्ता

र्डी : प्रसिद्ध दाक्षिणात्य गझल गायक एस़ विठ्ठलराव ऊर्फ विठ्ठलराव आत्माराम शिवपूरकर हे साई मंदिरातून बेपत्ता झाले आहेत़ याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी गुरुवारी शिर्डी पोलिसांत तक्रार दिली़
एस. विठ्ठलराव (८०) हे आंध्र प्रदेश व तेलंगणमध्ये सुुपरिचित होते. तेलंगणनिर्मितीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना राज्य सरकारच्या वतीने तेलंगण फाऊंडेशन ॲवॉर्डने गौरवण्यात येणार होते़ मात्र त्यापूर्वी ते २९ मे रोजी ते पत्नी, मुली व पुतण्यासह शिर्डीला साईदर्शनासाठी आले होते़ मंदिरात दुपारी एकच्या सुमारास दर्शन घेत असताना गाभार्‍यातच त्यांची व कुटुंबाची चुकामुक झाली़ ( प्रतिनिधी)

Web Title: South Ghazal missing from singer Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.