सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी

By Admin | Updated: January 9, 2017 23:16 IST2017-01-09T21:36:28+5:302017-01-09T23:16:23+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी

Sourav Ganguly threatens to kill | सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी

सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 9- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त आहे. अज्ञात व्यक्तिने चिट्ठी पाठवून गांगुलीला धमकी दिली आहे. 
 
स्वत: गांगुलीने  धमकी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असल्याची माहिती हिंदुस्तान टाइम्सने दिली. 5 जानेवारीला गांगुलीला एक चिट्ठी मिळाली. त्यामध्ये 19 जानेवारीला पश्चिम मेदिनीपुरच्या विद्यासागर युनिव्हर्सिटीमध्ये होणा-या कार्यक्रमात सहभागी झाला, तर यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे लिहिले आहे. ही चिठ्ठी गांगुलीच्या घराच्याबाहेर सापडली.
 
दरम्यान, या चिठ्ठीतून दिलेल्या धमकीबाबत गांगुलीने पोलिसांत तक्रार केली असून याबाबतची माहितीही पश्चिम मेदिनीपुरच्या विद्यासागर युनिव्हर्सिटीमध्ये होणा-या कार्यक्रमाच्या आयोजकांना दिली आहे. गांगुली या कार्यक्रमात जाणार की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही.या प्रकरणाची कोलकाता पोलिस चौकशी करत आहेत.    

 

Web Title: Sourav Ganguly threatens to kill