शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

आदेश मिळताच पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ; सीमेवरील आव्हानांसाठी आम्ही सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 01:14 IST

भारत व चीन दरम्यान हॉटलाइन सुरू करण्याचा प्रस्ताव असून, तो लवकरच प्रत्यक्षात येईल

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर हे आपल्या देशाचे अविभाज्य अंग आहे, असा संकल्प आपल्या संसदेचा आहे. जर संसदेने आदेश दिला, तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू, असे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केले. माणेकशॉ सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारतीय लष्कर हे भारतीय राज्यघटनेला प्राधान्य देते. गुप्तचर विभागाकडून आम्हाला विविध प्रकारची माहिती दररोज मिळत असते. त्या आधारेच त्यावर काम केले जाते. पाकिस्तानच्या बॅट या लष्करी तुकडीची माहिती आपल्याला मिळाली आणि बॅटच्या कारवाया आपण हाणून पाडल्या, असे नरवणे यांनी सांगितले.

लष्करप्रमुख म्हणाले की, पाकिस्तान व चीन या दोन्ही सीमांवरील आव्हाने परतवून लावण्यासाठी आपण सज्ज आहोत. अत्याधुनिक उपकरणांबरोबरच लष्कराला योग्य प्रशिक्षण देण्याचे कामही केले जात आहे. लष्करातील विविध विभागांशी समन्वय आणि एकत्रीकरण ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळाची पावले ओळखून लष्कराला आधुनिक बनविले जात आहे. कुठल्याही बाबींची कमतरता नाही. अतिमहत्त्वाच्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेतले जात आहेत.

महिलांची तुकडी लवकरच होईल दाखललष्करातील महिलांच्या १०० जणांच्या तुकडीचे प्रशिक्षण ६ जानेवारीपासून सुरू झाले आहे. लवकरच ही तुकडी दाखल होईल. सैन्यामध्ये येण्यासाठी लाखो अर्ज येत आहेत. मात्र, आमच्या निकषात बसत असलेल्यांनाच संधी दिली जात आहे, असे लष्करप्रमुखांनी सांगितले.कोणत्याही आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर देऊभारत व चीन दरम्यान हॉटलाइन सुरू करण्याचा प्रस्ताव असून, तो लवकरच प्रत्यक्षात येईल, असे सांगून मनोज नरवणे म्हणाले की, अपाचे हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर तर होवेत्झर आणि धनुष या आधुनिक तोफा मिळाल्याने लष्कर सशक्त झाले आहे. कुठल्याही प्रकारच्या आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान