शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'मंत्रीपदासाठी नाव आल्याचे समजताच मी रडायला लागले, हा सुखद धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 15:13 IST

मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश असून हे चारही नेते वेगळ्या पक्षांतून भाजपात आले आहेत.

ठळक मुद्देदिल्लीत आल्यानंतर मला मंत्रीपद मिळणार असल्याचं समजलं. खरं सांगू तर मी रडायलाच लागले होते, हे काय चाललंय, कसं चाललंय हे समजत नव्हतं. पण, हा सुखद धक्का होता, अशी प्रतिक्रिया नव्याने केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या डॉ. भारती पवार यांनी दिली

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामध्ये, भारती पवार आणि भागवत कराड यांच्या नावावर ऐनवेळी शिक्कामोर्तब झाले. त्यामुळेच, मंत्रीपद मिळणार हा सुखद धक्का होता, असे खासदार पवार यांनी म्हटले. 

मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश असून हे चारही नेते वेगळ्या पक्षांतून भाजपात आले आहेत. त्यामध्ये, नाशिकच्या दिंडोर मतदारसंघातून डॉ. भारती पवार खासदार बनल्या आहेत. द्रांक्षे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा मतदारसंघ आहे. मात्र, भारती पवार यांना मंत्रीपद दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात भारती पवार यांनी हा सुखद धक्का असल्याचं म्हटलं.   

सुखद धक्का होता, मला रडायलाच आलं

दिल्लीत आल्यानंतर मला मंत्रीपद मिळणार असल्याचं समजलं. खरं सांगू तर मी रडायलाच लागले होते, हे काय चाललंय, कसं चाललंय हे समजत नव्हतं. पण, हा सुखद धक्का होता, अशी प्रतिक्रिया नव्याने केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या डॉ. भारती पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. आमच्यासारख्य सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न नवीन मंत्रिमंडळात झालं आहे. माझ्यासह अनेक महिलांना संधी देण्यात आली. भाजपमध्ये काहीही होऊ शकतं, काम करणाऱ्यांना संधी मिळू शकते, हा संदेशही या निवडीतून देण्यात आल्याचं पवार यांनी म्हटलं. 

मोदींनी मराठीत संवाद साधला

मोदींसमवेतच्या बैठकीत संध्याकाळच्या शपथविधीसंदर्भात सांगण्यात आले. यावेळी मोदींनी आमच्याशी संवाद साधला, माझ्याशी बोलताना ते मराठीत बोलले. काय कसं काय, महाराष्ट्राचं काय चाललंय.. असा प्रश्न मोदींनी विचारला. मोदींनी आपुलकीने विचारपूस केली, असेही भारती पवार यांनी सांगितले. 

सासऱ्यांच्या पुण्याईने मंत्रीपद मिळाले

मी डॉक्टरकी करताना कधीही राजकारणाचा विचार केला नव्हता. पण, माझे सासरे स्वर्गीय एटी पवार हे 40 वर्षे आमदार होते. राज्यात माजी मंत्री राहिले आहेत, कदाचित त्यांच्या पुण्यामुळेच मी आज हा दिवस पाहत आहे. त्यांनी नेहमीच समाजसेवीची शिकवण दिलीय, लोकांची कामे जास्त प्रगल्भतेनं करा, हेच शिकवल्याचं डॉ. पवार यांनी म्हटलं. मी सुरुवातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीवर काम केलंय, स्थायी समितीवरही काम केलंय. आता खासदार आणि मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली असून तेही काम निष्ठने करेन, असे पवार यांनी म्हटले.     शिक्षण- एम.बी.बी.एस.

* जन्म दि.- १३ सप्टेंबर १९७८* जन्मगाव- नरूळ, ता. कळवण (नाशिक)* माहेरचे नाव- डॉ. भारती किसन बागूल* प्राथमिक शिक्षण- मुंबई* माध्यमिक शिक्षण- नाशिक* आवड, निवड, छंद- समाजसेवा व वाचन

* राजकीय वाटचाल- पती प्रवीण अर्जुन पवार यांचे भक्कम पाठबळ लाभले, माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांच्या सहवासात राजकीय प्रवासाला सुरुवात. जि.प.च्या उमराणे, मानूर गटातून दोन वेळा विजयी, २०१४ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पराभव, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी.* भविष्यातील वाटचाल- सामाजिक बांधिलकी जपत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार* संकल्प- केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा वापर करून मतदारसंघाचा कायापालट करणार. पाणी, रस्ते, वीज यासह मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करणार. 

टॅग्स :ministerमंत्रीBJPभाजपाdindori-acदिंडोरीNarendra Modiनरेंद्र मोदी