शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

... अखेर सोनू सूदची भेट झालीच, चाहत्याचा तेलंगणा ते मुंबई पायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 16:31 IST

तेलंगणातील एका चाहत्याने सोनूला भेटण्यासाठी तब्बल ७०० किलोमीटर पायी प्रवास केला आहे. व्यंकटेश हरिजन असे त्याचे नाव असून तो हैदराबादहून मुंबईला अनवाणी चालत आला आहे.

ठळक मुद्देतेलंगणातील एका चाहत्याने सोनूला भेटण्यासाठी तब्बल ७०० किलोमीटर पायी प्रवास केला आहे. व्यंकटेश हरिजन असे त्याचे नाव असून तो हैदराबादहून मुंबईला अनवाणी चालत आला आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान अनेक मजूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली होती. तर, दुसऱ्या लाटेतही सोनू सूदने अनेकांना औषधं, ऑक्सिजन सिलेंडर, इंजेक्शन मिळून दिले आहे. त्यामुळे अनेकांसाठी सोनू सूद देवदूत ठरला आहे. लोकांना मदत करण्याचा सोनूचा हा दिनक्रम लॉकडाऊननंतर ही सुरूच आहे. त्यामुळेच, पडद्यावर व्हिलन असलेल्या, पण प्रत्यक्ष जीवनात हिरो ठरलेल्या सोनूचे चाहते त्याच्यासाठी कायपण म्हणत त्याच्या कामाचं कौतुक करत आहेत. 

तेलंगणातील एका चाहत्याने सोनूला भेटण्यासाठी तब्बल ७०० किलोमीटर पायी प्रवास केला आहे. व्यंकटेश हरिजन असे त्याचे नाव असून तो हैदराबादहून मुंबईला अनवाणी चालत आला आहे. तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यातील दोरनापल्ली या गावचा तो रहिवाशी आहे. व्यंकटेश हा बारावीला शिक्षण घेत आहे. त्याचे वडिल ऑटो रिक्षा चालवतात, तर आईचे निधन झाले आहे. व्यंकटेशने 1 जून रोजी आपल्या मुंबई प्रवासासाठी प्रस्थान केले होते. तब्बल 10 दिवसानंतर तो मुंबईत पोहोचला आहे.   सोनूला भेटण्यासाठी त्याने हा लांबलचक पल्ला गाठला. सोनूने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन व्यंकटेशसोबतचा फोटो शेअर करत एवढ्या भरीव प्रेमासाठी आभार मानले आहेत. तसेच, इतर कुणीही एवढा त्रास सहन करून असे काही करू नये, असे आवाहनही त्याने फॅन्सला केले आहे. 

रियल हिरो बनला सोनू

सोनू सूदने कोरोना काळात लोकांची मोठी मदत केली. हॉस्पिटल बेड असो, औषधे असो, कामगारांना घरी पाठवण्याची सोय असो हे सगळे त्याने केले. त्याचे अनेक स्तरातून भरपूर कौतुक होत आहे. त्यातून जगभरात सोनूचे चाहते तयार झाले आहेत. पडद्यावरील हिरोपंतीपेक्षा रियल लाईफमधील हिरो म्हणून कोट्यवधी चाहत्यांना त्याने आपलंसं केलं आहे.   

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदcorona virusकोरोना वायरस बातम्याhyderabad caseहैदराबाद प्रकरणMumbaiमुंबई