सोनीचा जामीन अर्ज फेटाळला
By Admin | Updated: August 13, 2015 23:24 IST2015-08-13T23:24:09+5:302015-08-13T23:24:09+5:30
सोनीला जामीन नाकारला

सोनीचा जामीन अर्ज फेटाळला
स नीला जामीन नाकारलापणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणी अटकेत असलेला हवाला एजंट रायचंद सोनी याचा पहिला जामीन अर्ज येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी गुरुवारी फेटाळला. लाच प्रकरणी दिलेली रक्कम ही अमेरिकेतून भारतात हवालामार्गे आणण्याचे काम केल्याचा आरोप सोनीवर आहे. आपण हवालामार्गे लुईस बर्जर कंपनीच्या अधिकार्यांकडे रक्कम अनेकदा सुपूर्द केल्याचे सोनीने यापूर्वी मान्य केले आहे. मूळचा दुबई येथील असलेल्या सोनी यास पोलिसांकडून शुक्रवारी (दि.14) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे; कारण त्याची पोलीस कोठडीची मुदत आज संपुष्टात येत आहे. गेल्या 7 रोजी सोनी यास अटक झाली आहे. त्या वेळपासून तो कोठडीत आहे.(प्रतिनिधी).....