शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दे दणादण! राष्ट्रीय महामार्गावर टोल कर्मचारी आणि भाजपा नेत्यांमध्ये राडा, जोरदार हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 10:32 IST

टोल कर्मचारी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली.

हरियाणाच्या सोनीपतमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 334B वर असलेल्या झरोठी टोलवर गोंधळ झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते टोल नाक्यावर पोहोचले होते. याच दरम्यान, टोल कर्मचारी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तीरथ राणा व इतर नेत्यांनी टोल ऑपरेटरवर गंभीर आरोप करत सांगितलं की, टोल ऑपरेटर म्हणतो की, मी एका मोठ्या नेत्याच्या पीएसओचा भाचा आहे, माझं कोणी नुकसान करू शकत नाही. टोल कर्मचाऱ्यांनी भाजपाच्या नेत्यांना शिवीगाळ व गैरवर्तन केल्याचं देखील म्हटलं आहे. 

दुसरीकडे टोल ऑपरेटर विजेंद्र सिंह यांनी भाजपा नेत्यांवर मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे. खरखोडा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून तक्रारी दाखल झाल्या असून, पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तीरथ राणा, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष सितेंद्र दहिया आणि अन्य भाजप नेत्यांनी टोल कर्मचाऱ्यांवर आरोप करत सांगितले की, यापूर्वीही टोल कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणुकीच्या बातम्या येत होत्या. टोल कर्मचारी महिलांशी गैरवर्तन करतात. टोल कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास टोल नाक्यावर आंदोलन करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिला.

टोल ऑपरेटर विजेंद्र सिंह यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले असून त्यांनी आम्हाला मारहाण केली असून आम्ही भाजपा नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोनीपत खरखोडा पोलीस स्टेशनचे प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितले की, झरोठी टोल नाक्यावर भांडण झाल्याची माहिती मिळाली असून आता दोन्ही पक्षांनी तक्रारी दिल्या आहेत. टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. आम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहोत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाtollplazaटोलनाका