सोनिया यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

By Admin | Updated: March 29, 2015 01:26 IST2015-03-29T01:26:30+5:302015-03-29T01:26:30+5:30

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि बछरावा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Sonia's visit to farmers took place | सोनिया यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

सोनिया यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

रायबरेली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि बछरावा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
रायबरेलीत आल्यानंतर सोनिया गांधी ह्या अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पचवर गावात पोहोचल्या. तेथे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. आपले पीक नष्ट झाले आहे आणि आतापर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आलेला नाही, अशी तक्रार या शेतकऱ्यांनी केली.
सोनिया गांधी यांनी बांदीपूर व शिवपुरी गावात जाऊन शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या गहू व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Sonia's visit to farmers took place