सोनियांचा वाढदिवस साधेपणाने  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:59 IST2017-12-10T00:59:26+5:302017-12-10T00:59:31+5:30

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

 Sonia's Birthday Simply | सोनियांचा वाढदिवस साधेपणाने  

सोनियांचा वाढदिवस साधेपणाने  

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यकर्त्यांनी काँग्रेस मुख्यालयासमोर बँडबाजासह मिरवणूक काढून श्रीमती गांधी यांना शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसच्या नेत्यांनीही टिष्ट्वटरद्वारे सोनिया गांधी यांना शुभेच्छा दिल्या. श्रीमती गांधी यांनी कोणालाही भेटण्याचे टाळले. राहुल गांधी हे निवडणूक प्रचारातून वेळ काढून, सोनिया गांधी यांच्यासोबत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या देताना, त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्याची प्रार्थना केली आहे.

Web Title:  Sonia's Birthday Simply