सोनिया गांधी यांची सुप्रीम कोर्टात धाव

By Admin | Updated: February 5, 2016 03:07 IST2016-02-05T03:07:28+5:302016-02-05T03:07:28+5:30

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य दोघांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले

Sonia Gandhi's run in the Supreme Court | सोनिया गांधी यांची सुप्रीम कोर्टात धाव

सोनिया गांधी यांची सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य दोघांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणी बजावण्यात आलेला समन्स रद्द करण्याला ७ डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला होता.
सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्यासह याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने समन्स रद्द करण्याला नकार देतानाच या सर्वांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा ताबा कसा घेतला, अशी विचारणा करीत वर्तणुकीबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.

Web Title: Sonia Gandhi's run in the Supreme Court