शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या एकीसाठी सोनिया गांधींचे प्रयत्न; अधीररंजन यांची ममतांवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 07:50 IST

अधीररंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या मोदी यांच्या मोहिमेत ममता या सहभागी आहेत. काँग्रेसविरुद्धच्या मोहिमेत त्यांनी मोदी यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

शीलेश शर्मा -नवी दिल्ली : विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी सातत्याने तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांचा ममता बॅनर्जींशी छत्तीसचा आकडा असून, ममता यांच्यावर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. अधीररंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या मोदी यांच्या मोहिमेत ममता या सहभागी आहेत. काँग्रेसविरुद्धच्या मोहिमेत त्यांनी मोदी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. अभिषेक यांना ईडीपासून वाचविण्यासाठी ममता बॅनर्जी या काँग्रेस नेत्यांना राज्यसभेचे प्रलोभन देऊन तृणमूलमध्ये सहभागी करत आहेत. अलिकडेच सुष्मिता देव, फेलेरियो, अभिजीत मुखर्जी यांसारख्या नेत्यांना त्यांनी काँग्रेसपासून तोडत तृणमूलमध्ये सहभागी करुन घेतले आहे. गोवा, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यात तृणमूलचा जनाधार नाही. या राज्यात निवडणूक लढविण्याच्या घोषणेतून हे स्पष्ट आहे की, त्या काँग्रेसच्या वोट बँकेत फूट पाडत आहेत, जेणेकरुन भाजपला निवडणुकीत फायदा मिळू शकेल.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी