सोनिया गांधींची प्रकृती आता स्थिर - काँग्रेस

By Admin | Updated: August 3, 2016 13:49 IST2016-08-03T13:34:28+5:302016-08-03T13:49:01+5:30

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे असे काँग्रेस नेते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले.

Sonia Gandhi's condition is stable - Congress | सोनिया गांधींची प्रकृती आता स्थिर - काँग्रेस

सोनिया गांधींची प्रकृती आता स्थिर - काँग्रेस

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३ - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे असे काँग्रेस नेते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले. तापामुळे सोनिया गांधी यांना रात्री उशिरा दिल्लीच्या आर्मी रिसर्च रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
त्यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाकडून कोणतेही मेडीकल बुलेटीन काढण्यात आलेले नाही. वैद्यकीय देखरेखीखाली त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. प्रकृती खराब झाल्यामुळे काल त्या वारणासीमध्ये 'रोड शो' अर्ध्यावरच सोडून चार्टर्ड विमानाने दिल्लीला निघून आल्या. 
 
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात रोड शो मधून काँग्रेसने शक्तीप्रदर्शन केले. रोड शो नंतर त्यांचे भाषण होणार होते. पण प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीला परतावे लागले.  
 

Web Title: Sonia Gandhi's condition is stable - Congress