शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महागाई, बेरोजगारी, अदानी प्रकरण...सोनिया गांधींच्या पंतप्रधान मोदींना नऊ मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 13:32 IST

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने येत्या 18-22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. हे अधिवेशन का बोलवले, यात कोणते नवीन निर्णय घेतले जाणार, याबाबत विरोधकांमध्ये संभ्रम आहे. आता याच मुद्द्यावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. सोनिया गांधींनी आपल्या पत्रात विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर न केल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे, तर त्यांनी आपल्या बाजूने नऊ मागण्याही मांडल्या आहेत.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी सरकारवर निशाणा साधला. जयराम रमेश म्हणाले की, सोनियाजींनी विरोधकांचा मुद्दा मांडला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, विरोधकांशी कोणतीही चर्चा झाली नाही आणि हे मनमानी पद्धतीने केले जात आहे. आम्हाला अधिवेशनाचा अजेंडा अजिबात दिला गेला नाही, असे प्रथमच घडत आहे. या अधिवेशनातही आम्ही इंडिया आघाडीचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू.

सोनिया गांधी यांनी हे 9 मुद्दे उपस्थित केलेसोनिया गांधी यांनी या पत्रात एकूण 9 मुद्दे मांडले आहेत. यामध्ये आर्थिक स्थिती, महागाई, बेरोजगारी या विषयावर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सरकारने शेतकर्‍यांना दिलेली आश्वासने, एमएसपीचा हमीभाव यावर आतापर्यंत काय झाले? तसेच, अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशीची मागणी आणि जात जनगणना तातडीने करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

यासोबतच, संघीय संरचना, राज्य सरकारांवरील हल्ले, हिमाचल प्रदेशातील आपत्ती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी, देशातील सांप्रदायिक तणाव, मणिपूरमधील हिंसाचार आणि लडाखमध्ये चीनची घुसखोरी हे मुद्देदेखील यात मांडण्यात आले आहेत. सोनिया गांधी यांनी आपल्या दोन पानी पत्रात सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

संसदेचे विशेष अधिवेशनमोदी सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार अमृत कालशी संबंधित विषयांवर चर्चा होणार आहे. मात्र, सरकारने कोणतीही चर्चा आणि माहिती न देता विशेष अधिवेशन बोलावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या अधिवेशनाबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत, ज्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन, देशाचे नाव इंडियाऐवजी भारत करणे आणि महिला आरक्षण विधेयक मांडले जाण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, सरकारकडून अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस