शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघ सोडणार? 'या' राज्यात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 21:42 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी आली आहे.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) रायबरेलीतून (Raebareli) निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झालीये. सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढविण्याबाबतचा प्रस्ताव तेलंगणा काँग्रेसने मांडला आहे. तेलंगणातील मेडक मतदारसंघातून सोनिया गांधी निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील याच जागेवरून निवडणूक लढवली होती. आता सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा ठराव मंजूर केल्याचे काँग्रेस नेते मधु यक्षी गौर यांनी सांगितले आहे. 

रायबरेली काँग्रेसचा बालेकिल्लासोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत. रायबरेली हा जागा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्या चार निवडणुकांत सोनिया येथून विजयी होत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. देशात आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांमध्ये 3 निवडणुका वगळता, ही जागा प्रत्येक वेळी काँग्रेसकडे आली. देशाच्या 72 वर्षांच्या निवडणूक इतिहासात उत्तर प्रदेशची रायबरेली ही जागा 66 वर्षांपासून काँग्रेसकडे आहे.

रायबरेलीतून कोण लढणार?सोनिया गांधींनी रायबरेलीची जागा सोडली तर त्यांची मुलगी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या जागेवरून निवडणूक लढवू शकतात. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी अलीकडेच प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यापूर्वी राहुल गांधी या मतदारसंघातून तीनदा खासदार झाले आहेत. राहुल गांधी यावेळी अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही, याबाबत काँग्रेसने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. सध्या राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून खासदार आहेत. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. पण, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या डाव्यांनी वायनाड जागेवर दावा केला आहे. पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे असेल.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकTelanganaतेलंगणाUttar Pradeshउत्तर प्रदेश