शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांना भेटण्यावरुन सोनिया गांधी प्रणव मुखर्जींवर झाल्या होत्या नाराज, मातोश्रीवर न जाण्याचा दिला होता सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 17:14 IST

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याचा माझा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पटला नव्हता.

ठळक मुद्देशिवसेनेने भाजपाप्रणीत एनडीएमध्ये असूनही प्रणव मुखर्जींनी पाठिंबा जाहीर केला होता.'द कोएलिशन इयर्स :1996-2012'' या आत्मचरित्रात प्रणव मुखर्जी यांनी  बाळासाहेब ठाकरेंबरोबर झालेल्या भेटीविषयी सविस्तर भाष्य केले आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याचा माझा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पटला नव्हता. त्या माझ्यावर नाराज झाल्या होत्या. त्यांनी मला बाळासाहेबांची भेट न घेण्याचा सल्ला दिला होता. तरीही मी बाळासाहेबांना भेटलो होतो. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून हा खुलासा केला आहे. 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी प्रणव मुखर्जी महाराष्ट्र दौ-यावर असताना त्यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाप्रणीत एनडीएमध्ये असूनही प्रणव मुखर्जींनी पाठिंबा जाहीर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यावरुन ही भेट झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळी काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सहभागी होता. 

'द कोएलिशन इयर्स :1996-2012'' या आत्मचरित्रात प्रणव मुखर्जी यांनी  बाळासाहेब ठाकरेंबरोबर झालेल्या भेटीविषयी सविस्तर भाष्य केले आहे. 13 जुलै 2012 रोजी प्रणव मुखर्जी मुंबईत आले होते. भाजपासोबत असूनही शिवसेनेने न मागता पाठिंबा दिला होता. त्यांचा पाठिंबा पूर्णपणे अनपेक्षित होता असे मुखर्जी यांनी म्हटले आहे. मुंबई दौ-यात मी बाळासाहेबांची भेट घ्यावी का? याविषयी मी सोनिया गांधी आणि शरद पवार दोघांना विचारले होते. 

मातोश्रीवर चर्चेला येण्यासाठी मला बाळासाहेंबाकडून अनेक संदेश मिळाले होते. माझ्या आणि बाळासाहेबांच्या भेटीविषयी सोनिया गांधी फारशा उत्सुक्त नव्हत्या. शक्य असल्यास मी बाळासाहेबांची भेट टाळावी असे त्यांचे मत होते. सोनिया गांधींचा जो राजकीय दृष्टीकोन आहे त्या आधारावर मी बाळासाहेबांना भेटू नये असे त्यांना वाटत होते असे प्रणव मुखर्जींनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहीले आहे. शरद पवारांचा सल्ला बिलकुल याउलट होता. मी बाळासाहेबांना भेटावे असे शरद पवारांचे मत होते. माझ्या मातोश्री भेटीच्यावेळी तिथे खास व्यवस्था करण्यात आली होती असे मुखर्जी यांनी पुस्तकात लिहिले आहे.

मुंबई दौ-यात मी बाळासाहेबांना भेटलो नाही तर बाळासाहेब व्यक्तीगत अपमान केल्याचा अर्थ काढू शकतात असा पवारांनी मला सांगितले होते. आपल्या पारंपारिक मित्राची साथ सोडून ज्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला त्यांचा अपमान करण्याची माझी इच्छा नव्हती त्यामुळे मी सोनिया गांधींची इच्छा नसतानाही मातोश्रीवर बाळासाहेबांच्या भेटीसाठी गेलो असे मुखर्जींनी लिहीले आहे. मीच शरद पवारांना विमानतळावरुन मला मातोश्रीवर नेण्याची विनंती केली होती आणि ते ही लगेच तयार झाले असे पुस्तकात म्हटले आहे.