...म्हणून शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत केली राष्ट्रवादीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 05:07 PM2017-10-16T17:07:18+5:302017-10-16T17:11:32+5:30

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाच्या मुद्दावरून शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं सांगण्यात येत. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस सोडण्याचे खरं कारण मात्र वेगळं असल्याचा...

... so Sharad Pawar made the NCP quit the Congress | ...म्हणून शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत केली राष्ट्रवादीची स्थापना

...म्हणून शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत केली राष्ट्रवादीची स्थापना

googlenewsNext
ठळक मुद्देप्रणव मुखर्जी यांच्या द कोअलिशन ईयर्स या इंग्रजी पुस्तकाचं नुकतचं दिल्लीत प्रकाशन झालं.या पुस्तकामध्ये प्रणवदांनी अनेक राजकीय आठवणी आणि अनुभव सांगितले आहेत.या पुस्तकामध्ये शरद पवार यांची मंत्री, राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रणब मुखर्जी यांनी  प्रशंसा केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाच्या मुद्दावरून शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं सांगण्यात येत. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस सोडण्याचे खरं कारण मात्र वेगळं असल्याचा खुलासा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्ताकात केला आहे. द कोअलिशन ईयर्स : 1996-2012 असं या पुस्तकाचं नाव असून त्यांनी 1999 साली झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नेमकं काय घडलं होतं हे यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या द कोअलिशन ईयर्स या इंग्रजी पुस्तकाचं नुकतचं दिल्लीत प्रकाशन झालं. या पुस्तकामध्ये प्रणवदांनी अनेक राजकीय आठवणी आणि अनुभव सांगितले आहेत. यामध्ये शरद पवार हे काँग्रेसमधून का बाहेर पडले ? आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी कोणी विरोध केला याबाबत माहिती सांगितली आहे.

पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा असल्यामुळेच शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले असावेत असा अंदाज प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात छापला आहे. मात्र यापेक्षाही आणखी एक महत्वाची गोष्ट होती ज्यामुळे पवार नाराज झाले होते. वाजपेयी सरकार अल्पमतात आल्यानंतर काँग्रेस सोनिया गांधी यांच्याऐवजी आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी सांगेल असे पवारांना वाटत होते, मात्र असं न झाल्याने पवार नाराज झाले होते.

मुखर्जी यांनी लिहलंय की माझ्या माहितीनुसार त्यावेळी पवार हे लोकसभेमध्ये विरोधीपक्षनेते होते आणि त्यांना काँग्रेस पक्ष सत्तास्थापनेसाठी विचारेल असं वाटलं होतं. मात्र, सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांकडून सल्ला घेण्याऐवजी पी.शिवशंकर यांच्याकडून सल्ले घ्यायला सुरुवात केली होती. यामुळे नाराज झालेल्या पवारांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली असं या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.

1999 मध्ये काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये शरद पवारांनी सोनिया गांधींच्या इटालियन ओरिजनचा मुद्दा काढल्याची आठवण मुखर्जींनी पुस्तकात सांगितली आहे. या पुस्तकामध्ये शरद पवार यांची मंत्री, राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रणब मुखर्जी यांनी  प्रशंसा केली आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळेचा अनुभवही प्रणवदा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुंबईत आल्यावर मी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊ नये असं मत सोनिया गांधींचे होते. पण शरद पवारांनी बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी मला आग्रह केला. मी जर बाळासाहेबांची भेट घेतली नसती तर बाळासाहेब नाराज झाले असते आणि मला शिवसेनेचा पाठिंबाही मिळाला नसता असंही मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

 

 

Web Title: ... so Sharad Pawar made the NCP quit the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.