सोनिया गांधींनी फेटाळले भाजपचे आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:03 IST2016-05-04T16:40:29+5:302018-01-09T11:03:12+5:30
अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात भाजप आणखी काही नवीन खुलासे करणार असेल, तर त्यांचे स्वागत आहे असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी सांगितले.

सोनिया गांधींनी फेटाळले भाजपचे आरोप
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात भाजप आणखी काही नवीन खुलासे करणार असेल, तर त्यांचे स्वागत आहे असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी सांगितले. अगुस्ता वेस्टलँड लाच प्रकरणात भाजपने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लक्ष्य केले आहे.
राहुल गांधींची सहकारी कनिष्का सिंहचा हॅलिकॉप्टर घोटाळयाशी संबंध असल्याचा भाजपचा आरोप सोनियांनी फेटाळून लावला. भाजपच्या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी हा आरोप केला होता.