सोनिया गांधी राष्ट्रपतींना भेटल्या
By Admin | Updated: July 9, 2014 02:19 IST2014-07-09T02:19:39+5:302014-07-09T02:19:39+5:30
आपल्या पक्षाचा हक्क असल्याचा दावा काल केल्यानंतर आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली.

सोनिया गांधी राष्ट्रपतींना भेटल्या
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर आपल्या पक्षाचा हक्क असल्याचा दावा काल केल्यानंतर आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. तत्पूर्वी सोनिया गांधी यांनी सकाळी आपल्या पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली.
विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय तातडीने घेण्याबद्दल लोकसभा अध्यक्षा सुमित्र महाजन यांना पत्र लिहिण्याचा निर्णय संपुआ खासदारांनी घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली.
सोनिया गांधी यांची पक्षांच्या खासदारांशी झालेली बैठक अनौपारिक असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.
पत्र तयार आहे. त्यावर सर्व संपुआ खासदारांची स्वाक्षरी झाल्यानंतर ते लोकसभाध्यक्षांना पाठविण्यात येईल, असे काल काँग्रेसने म्हटले होते.
दरम्यान, राज्यसभेप्रमाणो लोकसभेतदेखील मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेते असल्यास सरकारला आनंद होईल, असे संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू म्हणाले. मात्र, त्यांनी लोकसभेतील विरोधीपक्ष नेतेपदाचा विषय लोकसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रतील असल्याचे स्पष्ट केले.
लोकसभेच्या 543 सदस्यांपैकी काँग्रेसकडे 44 सदस्य आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी सर्व पर्यायांवर विचार करण्याचे काँग्रेसने याआधीच सूतोवाच केले आहे. न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय देखील नाकारण्यात आलेला नाही. (वृत्तसंस्था)