शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रेवंत रेड्डींच्या शपथविधीला सोनिया गांधी उपस्थित राहणार? तेलंगणात उद्या नवीन सरकार स्थापन होणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 16:31 IST

राज्याच्या मुख्य सचिव ए. शांती कुमारी यांनी शपथविधी सोहळ्याच्या तयारीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बुधवारी एलबी स्टेडियमलाही भेट दिली.

हैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर तेलंगणाकाँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी हे गुरुवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 56 वर्षीय रेवंत रेड्डी यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी दुपारी 1:04 वाजता हैदराबादच्या विशाल एलबी स्टेडियमवर होणार आहे. राज्याच्या मुख्य सचिव ए. शांती कुमारी यांनी शपथविधी सोहळ्याच्या तयारीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बुधवारी एलबी स्टेडियमलाही भेट दिली.

रेवंत रेड्डी यांच्यासह किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. दरम्यान, रेवंत रेड्डी यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन केले. तसेच, सोनिया गांधी गुरुवारी हैदराबादमध्ये रेवंत रेड्डी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात.

संसदेबाहेर पत्रकारांनी सोनिया गांधींना या संदर्भात प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, 'कदाचित'. दरम्यान, रेवंत रेड्डी यांच्या शपथविधी सोहळ्याला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात, असे म्हटले जात आहे.

काँग्रेसने तेलंगणात  64 जागा जिंकल्याकाँग्रेस हायकमांडने मंगळवारी रेवंत रेड्डी यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (CLP) नेते आणि तेलंगणाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा (BRS) पराभव केला आणि एकूण 119 जागांपैकी 64 जागा जिंकल्या. सत्ताधारी  भारत राष्ट्र समितीला 39 जागांवर समाधान मानावे लागले. 

टॅग्स :Telanganaतेलंगणाcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३