तब्येत खराब झाल्याने सोनिया गांधींनी दौरा अर्धवट सोडला

By Admin | Updated: August 2, 2016 23:08 IST2016-08-02T23:07:51+5:302016-08-02T23:08:26+5:30

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना तब्येत बिघडल्याने वाराणसी दौरा अर्ध्यावरच सोडावा लागला आहे. सोनिया गांधी परत दिल्लीला रवाना झाल्या आहेत.

Sonia Gandhi left the tour partially due to poor health | तब्येत खराब झाल्याने सोनिया गांधींनी दौरा अर्धवट सोडला

तब्येत खराब झाल्याने सोनिया गांधींनी दौरा अर्धवट सोडला

ऑनलाइन लोकमत - 
वाराणसी, दि. 02 - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना तब्येत बिघडल्याने वाराणसी दौरा अर्ध्यावरच सोडावा लागला आहे. सोनिया गांधी विश्रांतीसाठी परत दिल्लीला रवाना झाल्या आहेत. सोनिया गांधींच्या नेतृत्वात सर्किट हाऊसपासून ते इंग्लिशिया लाईनपर्यंत रोड शो आयोजित करण्यात आला होता. मात्र जास्त ताप आल्याने सोनिया गांधींना अर्ध्यात माघारी फिरावं लागलं असल्याची माहिती आमदार अजय राय यांनी दिली आहे. 
 
सोनिया गांधींनी रोड शोच्या माध्यमातून उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत असल्याचं सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मतदारसंघ आहे. 
 
मोदींनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून सोनिया गांधींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. वाराणसी दौ-यावेळी सोनिया गांधींची तब्येत बिघडली असल्याचं कळलं, त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी तसंच उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
 

Web Title: Sonia Gandhi left the tour partially due to poor health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.