शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राफेल सौद्यावरून मोदींविरोधात सोनिया गांधी उतरल्या मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 03:57 IST

विरोधी ऐक्यासाठी सोनिया गांधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विधानानंतर शुक्रवारी खरोखरच श्रीमती गांधी मैदानात उतरलेल्या दिसल्या.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : विरोधी ऐक्यासाठी सोनिया गांधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विधानानंतर शुक्रवारी खरोखरच श्रीमती गांधी मैदानात उतरलेल्या दिसल्या. राफेल विमान खरेदी व्यवहारातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर संसदेच्या प्रांगणात झालेल्या निदर्शनांचे नेतृत्व त्यांनी केले. काँग्रेस, राष्ट्रवादी, राजद, डावे यांच्यासह अनेक पक्षांचे संसद सदस्य यात सहभागी झालेहोते.या खासदारांच्या हातात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधी घोषणांची पोस्टर्स होती. राफेल सौद्याची माहिती जाहीर करा, अशी मागणी ते करीत होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांतही विरोधकांनी हा विषय उपस्थित केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त चिकित्सा समिती स्थापण्यात यावी, अशी मागणी लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी, तर राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांनी केला. आतापर्यंत हा सर्वांत मोठा घोटाळा आहे, असे आझाद म्हणाले. आनंद शर्मा यांनीही या विषयावरून सरकारवर टीकास्त्र सोडले.राफेलसाठी फ्रान्सशी जो करार करण्यात आला, त्याची सत्यता सरकार दडवू पाहत आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. काँग्रेस सरकारने ही विमाने ५२६ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा करार केला होता. पण मोदी सरकारने त्यात बदल केला आणि विमानाची किंमत १६00 कोटी रुपये झाली. त्यामुळे यात ४५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे संसदीय समितीमार्फतच या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी.>हक्कभंग प्रस्ताव बारगळणार?हा विषय लोकसभेत उपस्थित झाला, तेव्हा भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी आपण राहुल गांधी यांच्याविरोधात दिलेल्या हक्कभंग प्रस्तावाचे काय झाले, असा सवाल केला. मात्र लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरुद्ध काँग्रेसनेही हक्कभंग प्रस्ताव दिला असून, सीतारामन यांनी या व्यवहाराबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसने त्यात केला आहे. संसदेच्या प्रांगणात शुक्रवारी निदर्शने करताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अंबिका सोनी, ए. के. अँटोनी आणि हुसेन दलवाई आदी अनेक नेतेही सामील झाले.>संसदेच्या अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस असल्याने विरोधकांनी सरकारवर तुटून पडण्याची ही संधी सोडली नाही.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस