सोनिया गांधींनी घेतले उडवा गाव दत्तक
By Admin | Updated: November 15, 2014 02:03 IST2014-11-15T02:03:09+5:302014-11-15T02:03:09+5:30
कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यसभा सदस्य कॅप्टन सतीश शर्मा यांनी आपापल्या मतदार संघांमधील एक गाव खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतले आहे.
सोनिया गांधींनी घेतले उडवा गाव दत्तक
रायबरेली : कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यसभा सदस्य कॅप्टन सतीश शर्मा यांनी आपापल्या मतदार संघांमधील एक गाव खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतले आहे.
रायबरेलीच्या खासदार असलेल्या सोनिया गांधी यांनी उडवा हे गाव, राहुल गांधी यांनी अमेठीतील डीह ब्लॉकमधील जगदीशपूर तर कॅप्टन शर्मा यांनी रायबरेलीतील सरेनी या गावाची निवड केल्याचे जिल्हाधिकारी महेंद्रकुमार यांनी सांगितले. ही तिन्ही गावे स्वातंत्र्य संग्रामाशी जुळलेली आहेत. उडवा हे राणा बेनीमाधव यांचे गाव म्हणून ओळखले जाते.
सरेनीतील शेतक:यांच्या आंदोलनाची वेगळी कहाणी आहे. जगदीशपूरचे सुपुत्र अखिलेश प्रतापसिंग यांनी काही महिन्यांपूर्वी लष्कराच्या सेवेत असताना वीरमरण पत्करले होते. (प्रतिनिधी)