शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींवरील चित्रपटांत परवानगीविना दोघा गीतकारांची वापरली गाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 04:55 IST

ज्यांनी या चित्रपटासाठी गीते लिहिलेलीच नाहीत, अशा दोघांची नावे पोस्टरवर छापल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याचा खुलासा करण्याच्या प्रयत्नात चित्रपटाच्या निर्मात्याने आणखी एक नवा वाद निर्माण केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटापुढील अडचणी वाढतच चालल्या असल्याचे दिसत आहे. या चित्रपटासाठी आपण गीत लिहिले नसल्याचा खुलासा प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी केल्यानंतर आता आपले नाव गीतकार म्हणून पोस्टरवर छापल्याबद्दल गीतकार समीर यांनीही आक्षेप घेतला आहे. त्यांनीही आपण या चित्रपटासाठी गाणे लिहिलेले नाही, असे समीर यांनी स्पष्ट केले आहे.ज्यांनी या चित्रपटासाठी गीते लिहिलेलीच नाहीत, अशा दोघांची नावे पोस्टरवर छापल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याचा खुलासा करण्याच्या प्रयत्नात चित्रपटाच्या निर्मात्याने आणखी एक नवा वाद निर्माण केला आहे. जावेद अख्तर व समीर या दोन गीतकारांनी अन्य चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटांत परस्पर वापरण्यात आल्याचे त्यामुळे उघड झाले आहे.‘१९४७ अर्थ’ चित्रपटातील ईश्वर अल्लाह हे जावेद अख्तर यांचे गीत व ‘दस’ चित्रपटातील सुनो गौर से दुनियावालो ही दोन गीते आम्ही चित्रपटांमध्ये वापरली आहेत. त्यामुळे आम्ही पोस्टरवर त्या दोघांची नावे छापली, असा खुलासा निर्मात्याने केला. पण त्यासाठी निर्मात्याने बहुधा या दोघा गीतकारांची पूर्वपरवानगी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे गीतकार ही गाणी चित्रपटातून काढून घेण्याची मागणी करू शकतील.प्रदर्शनास विरोधया चित्रपटाचे दिग्दर्शन उमंगकुमार यांनी केले आहे. याआधी त्यांनी मेरी कोम व सरबजीत या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. ‘पीएम नरेंद्र मोदी’ ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, त्यास द्रमुकसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे व मनसेच्या चित्रपट विभागाचे प्रमुख अमेय खोपकर यांनी तर चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाल्यास खळ्ळ्खट्याक केले जाईल, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी