गीतेंचा राजीनामा नाही!
By Admin | Updated: November 14, 2014 02:01 IST2014-11-14T02:01:44+5:302014-11-14T02:01:44+5:30
महाराष्ट्रात भाजपाला प्रखर विरोध करणारे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे कोणतेही निर्देश अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना अद्याप दिलेले नाहीत.

गीतेंचा राजीनामा नाही!
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
महाराष्ट्रात भाजपाला प्रखर विरोध करणारे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे कोणतेही निर्देश अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका बजावणारी शिवसेना केंद्रातील मोदी सरकारमध्ये कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या आठवडय़ाच्या प्रारंभी मुंबईहून दिल्लीत पोहोचलेले गीते यांनी अद्याप मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहा दिवसांच्या विदेश दौ:यावर रवाना झाले असताना गीते यांनी मात्र आपल्या मतदारसंघात जाणोच पसंत केले आहे. पुढच्या सोमवारी ते उद्योग भवनमधील आपल्या कार्यालयात हजेरी लावतील.
दरम्यान महाराष्ट्रात भाजपाला विरोध आणि केंद्रात मैत्री करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या दुहेरी धोरणामुळे शिवसेनेचे नेते कमालीचे गोंधळलेले दिसत आहेत. महाराष्ट्रात भाजप सरकार अल्पमतात असले तरी सरकार टिकविण्यासाठी भाजपाला शिवसेनेची अजिबात गरज नाही. केंद्रात तर भाजपा सरकार बहुमतात आहे. त्यामुळे तेथेही भाजपाला शिवसेनेची आवश्यकता वाटत नाही. लोकसभेत रालोआला शिवसेनेच्या 18 खासदारांच्या पाठिंब्याची गरज नाही. असे असले तरी शिवसेनेला विचार करण्यासाठी आणखी वेळ देण्याचा रालोआ नेतृत्वाचा विचार आहे. यावरून रालोआदेखील शिवसेनेला सोडण्याचा विचार करीत नसल्याचे स्पष्ट होते.
रालोआ अल्पमतात असलेल्या राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार आहेत. राज्यसभेत सर्व धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्ष
एकजूट आहेत. भविष्यात शिवसेनेची आवश्यकता पडू शकते, असे रालोआला वाटत असल्यामुळे गीते यांना राजीनामा
देण्यास सांगितले जाईल अथवा भविष्यात ते स्वत:हून राजीनामा देतील, अशी शक्यता दिसत नाही. मोदी विदेश दौ:यावर आहे. ते 2क् नोव्हेंबरला परत येतील. तोर्पयत तरी गीते केंद्रीय मंत्रिमंडळात कायम राहणार आहेत.