शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 07:54 IST

लेह हिंसाचारानंतर सोनम वांगचुक आणि इतरांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे सबळ पुरावे असल्याचे लडाख प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

लेह हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता वांगचुक यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. सोनम वांगचुक आणि इतरांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे सबळ पुरावे असल्याचे लडाख प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी आणि इतर अनेक जण सोनम वांगचुक यांच्या संघटनांविरुद्ध प्रशासनाच्या कारवाईला सुडाने केलेली कारवाई आहे असा आरोप करत होते. 

प्रशासनाने वांगचुक यांच्यावर गंभीर आरोप केले. २० सप्टेंबरला चर्चेसाठी ठरवले होते पण तरीही वांगचुक यांनी भडक विधाने केली.

युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!

९ सप्टेंबर २०२५ रोजी सोनम वांगचुक यांनी तरुणांना कोविडच्या नावाखाली होणाऱ्या निदर्शनांमध्ये सहभागी होताना मास्क, टोप्या आणि हुडी घालण्याचा सल्ला दिला होता, तर लडाखमध्ये कोविड पसरण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, असा आरोप प्रशासनाने केला.

हिंसाचार सुरू झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी तरुणांना शांत करण्यासाठी धाव घेतली, परंतु सोनम वांगचुक यांनी तसे करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, अनेक वेळा उपोषणस्थळावरून नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशचा उल्लेख करून तरुणांना चिथावण्याचा प्रयत्न केला, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

"११ सप्टेंबर २०२५ रोजी एका मुलाखतीत त्यांनी असे म्हटले होते की तरुण लोक म्हणत आहेत की त्यांना शांतता नको आहे. लोक तैनात सुरक्षा दलांना घाबरत नाहीत आणि जर लोक बाहेर पडले तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. स्थानिक भाषेत त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर त्यांनी सरकार उलथवून टाकण्यासाठी अरब स्प्रिंगसारखी चळवळ भारतात आणणार असल्याचे म्हटले असल्याचा आरोप आहे. 

सरकारवर आरोप केले

लडाखमधील मागण्यांसाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रस्तावही मांडला होता. त्यांना अनावश्यकपणे या प्रकरणात गोवण्यात आले आहे. HIAL आणि SECMOL मधील कारवाई उपलब्ध कागदपत्रांवर आधारित होती, परकीय चलन उल्लंघनाची एजन्सींकडून चौकशी सुरू आहे. असा युक्तिवाद प्रशासनाचा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sonam Wangchuk Faces Trouble: Administration Claims Sufficient Evidence for Action

Web Summary : Sonam Wangchuk's problems escalate as Ladakh administration claims strong evidence for action against him following Leh violence. Accusations include inciting youth, making provocative statements, and planning anti-government movements. Authorities cite concerns over COVID-19 misinformation and potential unrest.
टॅग्स :ladakhलडाख