शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:50 IST

सोनमच्या भावाने म्हटले की, जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. बहीण सोनम गाजीपूरला कशी पोहोचली, हे आपल्याला माहीत नसल्याचे देखील त्याने म्हटले.

मेघालयात बेपत्ता झालेल्या इंदूरच्या हनिमून कपलच्या प्रकरणाला सोमवारी सकाळी एक नवीन वळण मिळाले. या जोडीतील बेपत्ता मुलगी सोनम उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये सापडली. तिने स्वतः तिच्या कुटुंबियांना फोन करून ती गाजीपूरमधील एका चहाच्या टपरीवर असल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी सोनमला गाझीपूरमधील वन स्टॉप सेंटरमध्ये नेले. संपूर्ण प्रकरण मेघालयशी संबंधित असल्याने, तिथल्या पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. 

काय म्हणाला गोविंद?

मेघालयहून आल्यावर सोनमला पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. याआधी सोनमचा भाऊ गोविंद त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी इंदूरहून गाजीपूरच्या वन स्टॉप सेंटरवर पोहोचला आहे. सोनमचा भाऊ दिसताच मीडियाने त्याच्यावर प्रश्नांचा वर्षाव केला. यावर मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना तो म्हणाला की, "माझी बहीण निर्दोष आहे. पण, जर ती दोषी असेल तर, तिला फाशी देण्यात यावी."

सोनमच्या भावाने म्हटले की, जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. बहीण सोनम गाजीपूरला कशी पोहोचली, हे आपल्याला माहीत नसल्याचे देखील त्याने म्हटले. त्याने मीडियाला विनंती केली की, त्याला आधी त्याच्या बहिणीला भेटण्याची परवानगी द्यावी. सोनमवर होणाऱ्या आरोपांबद्दल आपल्या काहीच माहीत नसल्याचे त्याने म्हटले. 

गोविंद म्हणाला की, "मी दूरचा प्रवास करून आलो आहे. मला काहीच माहिती नाही. जर, सोनमची चूक असेल तर तिला फाशी दिली पाहिजे. पण, मला आधी सोनमला भेटू द्या."

आमची मुलगी निर्दोष!दुसरीकडे, सोनमची आईने म्हणाली की, "आमची मुलगी सापडल्यानंतर आम्हाला फारसा आनंद झालेला नाही. जावयाच्या मृत्यूच्या बातमीने आम्ही आधीच दुःखी आहोत. आता आम्हाला आमची मुलगी सापडली आहे, त्यामुळे सत्य बाहेर येईल. काय घडले याबद्दल आम्ही आत्ता काहीच सांगू शकत नाही. आम्ही आमच्या मुलीला अद्याप भेटलेलो नाही. सध्या, आम्ही पोलीस काय म्हणत आहेत तेच ऐकत आहोत. आम्हाला आमच्या मुलीशी बोलल्यानंतरच काय घडलं हे कळेल."

सध्या गाझीपूर पोलीस मेघालय पोलिसांची वाट पाहत आहेत. ते येताच सोनमला त्यांच्या ताब्यात दिले जाईल. गाझीपूर पोलिसांनी अद्याप सोनमची चौकशी केलेली नाही, परंतु सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाला तर, सोनमने चौकशी दरम्यान आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपले अपहरण झाले होते, असा दावा देखील तिने केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी