सोनल शहा प्रथम

By Admin | Updated: May 28, 2015 23:58 IST2015-05-28T23:58:51+5:302015-05-28T23:58:51+5:30

शिक्रापूर : श्री भैरवनाथ विद्यामंदिर, पाबळ शाळेचा १२वी परीक्षेचा निकाल ९५.३८ टक्के लागला असून, वाणिज्य शाखेतील सोनल संतोष शहा ९०.१५ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली.

Sonal Shah First | सोनल शहा प्रथम

सोनल शहा प्रथम

क्रापूर : श्री भैरवनाथ विद्यामंदिर, पाबळ शाळेचा १२वी परीक्षेचा निकाल ९५.३८ टक्के लागला असून, वाणिज्य शाखेतील सोनल संतोष शहा ९०.१५ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली.
शास्त्र शाखेत निशांत गोरक्ष डफळ ८५.०७ टक्के गुण मिळवून शास्त्र शाखेत प्रथम, तर वंदना सुरेश जाधव ७५.५३ टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आली. ऑटो विभागात ओंकार कैलास आढाव, इलेक्ट्रिकल शाखेत सचिन बाळू वाघोले, हॉर्टिकल्चर विभागात अश्विनी बाळासाहेब दौंडकर यांनी विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य चांगदेव केदार, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व जि. प. सदस्य नंदकुमार पिंगळे, सचिव रवींद्र चौधरी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
------------------------

Web Title: Sonal Shah First