शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:33 IST

पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला.

श्रीनगर : पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. जवानांच्या या धाडसी कारवाईत मंगळवारी पहाटे चार अतिरेकी ठार झाले असले, तरी मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आले. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्यही ही कारवाई मध्यरात्री सुरू झाली होती.कौस्तुभ राणे हे मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडचे रहिवासी होते. त्यांच्याखेरीज हवालदार जमी सिंग, हवालदार विक्रमजीत व रायफलमॅन मनदीप हेही या कारवाईमध्ये हुतात्मा झाले आहेत. कौस्तुभ राणेंबरोबरच हे तिघेही लष्कराच्या ३६ राष्ट्रीय रायफल्सचा भाग होते.भारतात घातपात घडवून आणण्यासाठी ८ दहशतवादी काश्मीरमार्गे घुसणार असल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलांचे जवान सतर्क झाले होते. हे अतिरेकी घुसण्याच्या प्रयत्नात असताना, त्यात अडथळे येऊ नयेत, म्हणून पाकिस्तानी लष्कराने भारतीय सीमेवर निष्कारण गोळीबार सुरू केला. त्या वेळी मेजर राणे व अन्य जवानांनी या अतिरेक्यांना घुसता येऊ नये, म्हणून जिवाची बाजी लावली. त्यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला तोंड देतानाच दहशतवाद्यांना अडवण्याचेही प्रयत्न सुरू केले. या अतिरेक्यांनीही जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला त्याच पद्धतीने मेजर राणे व त्यांच्या सहकाºयांनी प्रत्युत्तर दिले. त्यात चार अतिरेकी ठार झाले, तर उरलेले चौघे जण बहुधा पळून गेले. पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असून, कारवाईनंतर गुरेज सेक्टरमधील सर्वच नियंत्रण रेषांपाशी व परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यापैकी दोन अतिरेक्यांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य दोन मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. >घुसखोरी रोखताना जिवाची बाजीकौस्तुभ हे मीरा रोडचे (ठाणे) राहणारे. त्यांचे काका प्रताप राणे यांनी सांगितले की, एप्रिलमध्येच कौस्तुभ भेटून गेला होता. सीमेवर उंचावर असल्याने संपर्कव्हायचा नाही, पण कॅम्पमध्ये आला की, रात्री २-३ वाजता तो फोन करून मी ठीक आहे, असे कळवायचा. तेवढेच त्याच्याशी घरच्यांचे बोलणे व्हायचे. गस्तीवरून यायला उशीर झाला की, जेवण संपलेले असायचे. २५ जुलैला त्याच्या दोन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.>सहा महिन्यांत १३३ प्रयत्न; ६९ अतिरेकी घुसलेनवी दिल्ली : या वर्षी जानेवारी ते जून या काळात पाकिस्तानातून ६९ अतिरेकी भारतात घुसले. वर्षभरात घुसखोरीचे एकूण १३३ प्रयत्न झाले. जवानांनी १४ घुसखोर जवानांना ठार केले, तर ५0 घुसखोरांचे प्रयत्न जवानांमुळे असफल ठरले आणि ते पळून गेले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज लोकसभेत दिली. गेल्या वर्षी घुसखोरीचे ४0६ प्रयत्न झाले होते आणि १२३ दहशतवादी भारतात घुसले होते, असे सांगून ते म्हणाले की, या वर्षी काश्मीरमध्ये झालेल्या ९0 चकमकींमध्ये ११३ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, त्यात सुरक्षा दलांचे ३९ जवानही शहीद झाले. यंदा काश्मिरात आतापर्यंत हिंसाचाराच्या ३0८ घटना घडल्या.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर