शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सॅल्यूट! दोन IIM मध्ये मिळत होती अ‍ॅडमिशन; पण शहीद वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यानं निवडलं देशसेवेचं 'मिशन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 13:25 IST

देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलानं आयआयएम सोडून लष्करात जाण्याचा मोठा निर्णय घेतलाय.

कारगिल युद्धात देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलानं आयआयएम सोडून लष्करात जाण्याचा मोठा निर्णय घेतलाय. प्रज्वल समृत (Prajwal Samrit)असं त्याचं आहे. प्रज्वलच्या जन्माच्या अवघ्या ४५ दिवस आधी, त्यांचे वडील लान्स नाईक कृष्णाजी समृत १९९९ मध्ये कारगिल युद्धात शहीद झाले. यावेळी त्यांचा मोठा मुलगा अडीच वर्षांचा होता. त्यानं लष्करात अधिकारी म्हणून जावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु आता आपल्या वडिलांची ही इच्छा त्यांचा छोटा मुलगा पूर्ण करणार आहे.

प्रज्वल जूनच्या पहिल्या आठवड्यात डेहराडूनमधील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये (IMA) कॅडेट म्हणून रुजू होणार असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलंय. त्याचा मोठा भाऊ कुणाल इंजिनिअरिंगला गेल्यानंतर, प्रज्वलनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नऊ वेळा सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या (SSB) मुलाखतीला सामोरे गेलेल्या प्रज्वलसाठी हे बिलकुल सोपं नव्हतं.

बारावीनंतर ड्रॉप घेतला

“आम्हाला योग्य तारीख माहित नाही. पण आम्ही ३० जुलैला त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. २०१८ मध्ये मी एनडीएच्या प्रवेशासाठी बारावीनंतर ड्रॉप घेतला होता आणि पहिली एसएसबी उत्तीर्ण केली होती. परंतु मेडिकल परीक्षेत अपयश आलं. त्यानंतर पुण्याला जाऊन बीएससीसाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. मी एसएसबीच्या सात आणखी मुलाखती दिल्या. प्रत्येक वेळी स्क्रिनिंगमधून पुझे गेलो आणि कॉन्फ्रेंटमघ्ये बाहेर गेलो,” असं प्रज्वलनं सांगितलं.

आठव्यांदाही आपण अपयशी ठरलो आणि जवळपास पराभवच स्वीकारला. परंतु आपला शेजारी नितीन यानं अखेरच्या संधीपर्यंत प्रयत्न करण्यास सांगितलं. प्रज्वलनं आठव्यांदा अपयश आल्यानंतर जवळपास पराभव स्वीकारला होता. परंतु मी त्याला विश्वास ठेवण्यास सांगितलं. त्यानं आपल्या जीवनातील सर्वच परीक्षांमध्ये टॉप केलं. त्यानं सर्वकाही आपल्याच हिंमतीवर मिळवल्याचं नितीन यांनी सांगितलं.

अखेरची संधी

“ही माझ्यासाठी अखेरची संधी असल्यामुळे मला एक मजबूत बॅकअप प्लॅन तयार करावा लागला. मी कॉमन ॲडमिशन टेस्ट क्रॅक केली आणि या महिन्यात आयआयएम इंदूर आणि कोझिकोडमधून ऑफर मिळाली,” असं प्रज्वलनं आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं. “जरी कारगिल युद्धात आपल्याला आपल्या पतीला गमवावं लागलं असलं तरी आपला एक मुलगा त्यांचं स्वप्न पूर्ण करेल असा निश्चय केला होता,” असं प्रज्वलची आई सविता यांनी म्हटलं.

अभिमान वाटतो

“माझ्या मोठ्या मुलानं लष्करातील अधिकारी व्हावं असं माझ्या पतीची इच्छा होती. परंतु मोठा मुलगा कुणालला ते शक्य झालं नाही. परंतु प्रज्वल हे करू शकतो अशी आम्हाला अपेक्षा होती. आज आम्हाला अतिशय अभिमान वाटतो,” असं त्या म्हणाल्या. प्रज्वलची आई सविता या पुलगांवमधी आर्मी हॉस्पीटलमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. १९९१ मध्ये कृष्णाजी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. कारगिलमध्ये जाण्यापूर्वी हे दांपत्य त्रिवेंद्रम, बेळगाव आणि कोलकात्यात वास्तव्यास होतं. परंतु आता त्या पुलगाममध्येच वास्तव्यास आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत