..तीने पीसीआर व्हॅनमध्ये दिला मुलाला जन्म
By Admin | Updated: May 30, 2016 10:11 IST2016-05-30T10:11:39+5:302016-05-30T10:11:39+5:30
दिल्ली पोलिसांच्या पीसीआर व्हॅनमध्ये रविवारी एका २९ वर्षीय महिलेने मुलाला जन्म दिल्याची घटना घडली.

..तीने पीसीआर व्हॅनमध्ये दिला मुलाला जन्म
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - दिल्ली पोलिसांच्या पीसीआर व्हॅनमध्ये रविवारी एका २९ वर्षीय महिलेने मुलाला जन्म दिल्याची घटना घडली. आरती असे या महिलेचे नाव आहे. ती ट्रेनने ग्वालियर येथून समलखा पानिपत येथे चालली होती. ट्रेनमध्ये असताना आरतीला अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या.
यावेळी आरतीसोबत तिचे सासू-सासरे होते. ते तिघेही जवळच्या सबजी मंडी रेल्वे स्थानकात उतरले व रेल्वे प्रशासनाकडे मदतीची मागणी केली. रेल्वे कर्मचा-यांनी पोलिसांना बोलवले. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
ते आरतीला पीसीआर व्हॅनमधून हिंदूराव रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना आरतीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. नंतर आरतीला आणि तिच्या मुलाला हिंदूराव रुग्णालयात दाखल केले. दिल्ली पोलिसांच्या पीसीआर स्टाफचे हे एक आणखी चांगले काम आहे असे दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी सांगितले.
२७ मे रोजी पीसीआर व्हॅनमधील दोन पोलिसांनी एका गाडीचा पाठलाग करुन एका १९ वर्षीय मुलीची सुटका केली होती. या मुलीचे गीता घाट येथून अपहरण झाले होते.