शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

CoronaVirus: 'वडिलांचा हात कापला गेल्याची बातमी आईला दिसू नये म्हणून मी टीव्हीच बंद केला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 13:50 IST

coronavirus पंजाबच्या पटियालामध्ये निहंगांचा पोलिसांवर हल्ला; उपनिरीक्षकाचा हात शरीरापासून वेगळा

चंदिगढ: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर काल पंजाबमध्ये हल्ला झाला. पटियालामध्ये निहंगांनी केलेल्या हल्ल्यात उपनिरीक्षक हरजीत सिंह यांचा हात कापला गेला. यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमधल्या डॉक्टरांना हरजीत सिंह यांचा हात जोडण्यात यश आलं. हरजीत यांच्या कुटुंबानं या संकटाचा मोठ्या धीरानं सामना केला.हरजीत पत्नी बलविंदर कौर आणि मुलगा अर्शप्रीत यांच्यासोबत राहतात. तर हरजीत यांचे आई-वडील त्यांचे लहान बंधू गुरजीत यांच्या सोबत वास्तव्यास आहेत. एका हिंदी वृत्तसंकेतस्थळानं गुरजीत यांच्याशी संवाद साधला. 'माझे मोठे बंधू हरजीत सिंग (४८) पटियालाच्या सदर पोलीस ठाण्यात काम करतात. तर मी तिथपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजपुरामध्ये राहतो. काल सकाळी सव्वा सहाच्या सुमारास मला एका मित्राचा फोन आला. हरजीतचा हात कापला गेल्याची माहिती त्यानं मला दिली. ते ऐकून मला प्रचंड धक्का बसला. मी तातडीनं घरातून निघालो. त्याच्या चेहऱ्यावर अजिबात वेदना दिसत नव्हती. त्याच्यावर उपचार सुरू होते,' असं गुरजीत यांनी सांगितलं.आम्ही कुटुंबियांना याबद्दलची माहिती दिली नाही. वहिनींना (हरजीत यांची पत्नी) प्रचंड मोठा मानसिक धक्का बसेल, अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी त्यांना फोनच केला नाही. मात्र अर्शदीपनं टीव्हीवर सगळं पाहिलं होतं. त्यानं मला फोन करून सर्व सांगितलं. आईला याबद्दल कळू नये म्हणून त्यानं टीव्हीची केबल काढली होती. मी आमच्या आई-वडिलांनाही याबद्दलची माहिती संध्याकाळी दिली, अशी आपबिती गुरजीत यांनी सांगितली. लॉकडाऊन दरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसोबत होत असलेल्या गैरवर्तनाबद्दल गुरजीत यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. त्यांच्यासोबत केलं जाणारं वर्तन अशोभनीय आणि संतापजनक असल्याचं गुरजीत म्हणाले. 

नेमकी घटना काय?पटियालाच्या भाजी मंडईत जाणारी काल काल पोलिसांनी रोखली. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ थांबवलं आणि कर्फ्यू पासबद्दल विचारणा केली. मात्र ते थेट बॅरिकेडिंग तोडून पुढे गेले. पोलिसांनी त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर निहंगांनी गाडीतून बाहेर पडून पोलिसांवर हल्ला केला. त्यात हरजीत सिंग यांचा हात कापला गेला. सिंग यांचा हात अक्षरश: शरीरापासून वेगळा झाला. निहंगांच्या हल्ल्यात आणखी दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या