शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Somnath Chatterjee death updates: दोन ध्रुवांवरची सोमनाथ- स्वराज जोडी लोकसभेला हसवायची तेव्हा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 11:48 IST

Somnath Chatterjee death updates: लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे आज निधन झाले.

मुंबई- लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे आज निधन झाले. पश्चिम बंगालमधील एक उत्तम नेता आणि तितकेच प्रभावी संसदपटू असणा-या सोमनाथबाबूंच्या कार्यकाळातील आठवणी भारतीयांच्या मनात सदैव राहतील. लोकसभेत त्यांची भाषणे आणि सभापतीपदी असताना त्यांनी केलेले काम संसदेच्या इतिहासातील शाश्वत पाने म्हणून ओळखली जातील. लोकसभेत सोमनाथ चॅटर्जी डाव्या पक्षाचे तर सुषमा स्वराज या भारतीय जनता पक्षाच्या असल्या तरी या दोघांमध्ये बहीण-भावासारखे नाते दिसून येई. त्याबद्दल लोकसभेत अनेकदा दोन्ही नेत्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. भारत हा कसा एकात्म आहे, संपूर्ण भारतातील प्रांतांचे आहार, नृत्य, तीर्थक्षेत्रे कसे भारतीय आहेत हे सांगताना सुषमा स्वराज यांनी थेट सोमनाथबाबूंचे उदाहरण सांगितले. भारतीय लोक सर्व प्रांताना आपले मानत नसते तर कोलकात्यात जन्मलेले एन. सी. चॅटर्जी यांनी आपल्या मुलाचे नाव सोमनाथ ठेवले नसते.(सोमनाथ तीर्थक्षेत्र गुजरातमध्ये आहे).सुषमा स्वराज यांच्या या विधानामुळे संपूर्ण लोकसभा हास्यकल्लोळात बुडून गेली. खुद्द सोमनाथ चॅटर्जी यांनाही हसू आवरले नव्हते तर भाजपाच्या आघाडीच्या नेत्या राजमाता विजयाराजे सिंदिया यांनी स्वराज यांची पाठ थोपटली होती. असे हास्यविनोद स्वराज आणि चॅटर्जी यांच्या भाषणात असल्यामुळे लोकसभेत तणाव निवळण्यास मदत येई. या जोडीतील एखाद्या आरोपाबद्दल दुस-या नेत्यास स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास भाषण थांबवून हे दोन्ही नेते खाली बसत. चॅटर्जी यांच्या निवृत्तीनंतर हे चित्र पुन्हा दिसले नाही.सभापती असताना चॅटर्जी यांनी एके दिवशी अचानक बंगालीमध्ये बोलायला सुरुवात केली. या अचानक बंगाली निवेदनाचा कोणालाही काहीच बोध झाला नाही. शेवटी आज मातृभाषा दिन आहे, असे सांगत चॅटर्जी यांनी खुलासा केला. त्यानंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या मातृभाषेत भाषणे करून चॅटर्जी यांना धन्यवाद दिले.

टॅग्स :Somnath Chatterjeeसोमनाथ चॅटर्जीSushma Swarajसुषमा स्वराजlok sabhaलोकसभा