सोमनाथ भारतींच्या आई सूनबाईच्या पत्रपरिषदेत
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्या पत्नी लिपिका यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत चांगलेच महानाट्य पाहायला मिळाले. सोमनाथ यांच्या आई मनोरमा राणी भारती अचानक पत्रपरिषदेला पोहोचल्या. आपला मुलगा आणि सून एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतील तर मी वृद्धाश्रमात राहायला तयार आहे, असे त्यांनी यावेळी जाहीर करून टाकले.

सोमनाथ भारतींच्या आई सूनबाईच्या पत्रपरिषदेत
न ी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्या पत्नी लिपिका यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत चांगलेच महानाट्य पाहायला मिळाले. सोमनाथ यांच्या आई मनोरमा राणी भारती अचानक पत्रपरिषदेला पोहोचल्या. आपला मुलगा आणि सून एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतील तर मी वृद्धाश्रमात राहायला तयार आहे, असे त्यांनी यावेळी जाहीर करून टाकले.लिपिकांनी पतीकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याची तक्रार दिल्ली महिला आयोगाकडे नोंदवली आहे. या तक्रारीत लिपिकांनी सासूकडूनही छळ होत असल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर लिपिकांनी सोमवारी पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. पत्रपरिषद सुुरू असतानाच लिपिकाच्या सासूबाई आपल्या वकिलासह या ठिकाणी पोहोचल्या. माझ्यामुळे माझी सून माझ्या मुलासोबत राहू इच्छित नसल्याचे मला कळले. माझ्यासाठी निश्चितपणे हे वेदनादायी आहे. पण मुलगा आणि सून एकत्र गुण्यागोविंदाने नांदणार असतील तर त्यांच्या सुखासाठी मी वृद्धाश्रमात राहायला तयार आहे, असे त्या म्हणाल्या. अलीकडे मी आईला घराबाहेर काढावे, अशी लिपिकाची इच्छा असल्याचा दावा सोमनाथ यांनी केला होता.बॉक्सलिपिका यांचे नवे आरोपसोमनाथ भारती यांनी निवडणुकीदरम्यान सादर प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्या पत्नी लिपिका भारती यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. दिल्लीत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना भारतींनी मला ई-मेल करून माझी माहिती मागवली होती. मात्र मी या ई-मेलचे कुठलेही उत्तर दिले नव्हते. यानंतर सोमनाथ यांनी स्वत:च्या प्रतिज्ञापत्रात माझ्या स्वाक्षरीशिवाय माझे बँक खाते आणि कर्जाबाबत माहिती भरली. ही माहिती खोटी आहे आणि याचा तपास व्हायला हवा, असे लिपिका यावेळी म्हणाल्या. मी तक्रार केल्यापासून सोमनाथ यांनी माझ्यावर मी भाजपासाठी काम करीत असल्याचा आरोप चालवला आहे. मी हे सर्व पोलिसांच्या इशाऱ्यावर करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केजरीवाल यांच्याकडेही मी सोमनाथ यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे, असेही लिपिकांनी सांगितले.