शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कुछ तो गडबड है.... तेजस्वी यादव यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा गणिताचा क्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 13:47 IST

आकडेवारीचा आधार घेऊन मोदींच्या दाव्याची खिल्ली

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याचा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विटरवर चांगलाच समाचार घेतला आहे. बिहारच्या दौऱ्यावर असताना मोदींनी राज्य सरकारने उभारलेल्या शौचालयांच्या संख्येचा उल्लेख केला होता. बिहार सरकारनं आठवड्याभरात ८.५ लाख शौचालयं बांधल्याचं मोदींनी काल (मंगळवारी) म्हटलं होतं. तेजस्वी यादव यांनी यावरुन मोदींचा गणिताचा क्लास घेतला आहे. बिहार सरकारने आठवड्याभरात ८.५ लाख शौचालयं बांधली, असं मोदींनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं. मोदींच्या या दाव्याची तेजस्वी यादव यांनी गणिताचा आधार घेऊन खिल्ली उडवली. राज्य सरकारनं दर मिनिटाला ८४ शौचालयं बांधली असतील, तरच मोदींनी दिलेला आकडा खरा समजता येईल, असं तेजस्वी यादव यांनी आकडेमोड करुन ट्विटरवर म्हटलं आहे. मोदींचा दावा फसवा असल्याची टीकाही त्यांनी केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीदेखील मोदींच्या दाव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात शौचालयांची बांधणी करणं अशक्य असल्याचं निरुपम म्हणाले. 

 

महात्मा गांधी यांनी बिहारच्या चंपारण्यात सत्याग्रह केला होता. त्या सत्याग्रहाच्या स्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख केला. या अभियानासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कामाचंही त्यांनी कौतुक केलं. 'गेल्या आठवड्याभरात बिहारमध्ये ८ लाख ५० हजार शौचालयं बांधण्यात आली. हे एक मोठं यश आहे. यासाठी मी जनतेचं आणि सरकारचं अभिनंदन करतो,' असं मोदींनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार