शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"काही तरी मोठं घडणार...!" एस जयशंकर यांची मोठी भविष्यवाणी; चीनलाही थेट मेसेज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 21:30 IST

...यावेळी त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दोऱ्यानंत, पुढील दोन वर्षांत होणाऱ्या काही बदलांसंदर्भात भाष्य केले.

हे चांगले आहे की वाईट, हे मी सांगत नाही... मी केवळ काय होणार याचा अंदाज लावत आहे आणि मला वाटते, आगामी काळात काही तरी मोठे घडणार आहे. अशी भविष्यवाणी भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केली आहे. ते गेल्या आठवड्यात  म्युनिक सुरक्षा परिषदेनंतर, दिल्लीस्थित थिंकटँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दोऱ्यानंत, पुढील दोन वर्षांत होणाऱ्या काही बदलांसंदर्भात भाष्य केले.

परराष्ट्रमंत्र्यांच्या बोलण्यावरून असे दिसते की, भारत जगभरात चीनचे वाढते वर्चस्व आणि आक्रमकता कमी करण्यासाठी व्यापक सहमती बनविण्याचा प्रयत्न करत आहे. जयशंकर म्हणाले, "नियमांवर आधारित व्यवस्था असो अथवा बहुपक्षीय संघटना असो, चीन त्याचा सर्वाधिक फायदा घेत आहे. आपण सर्वजण यावर सहमत आहोत. आम्ही तर असेही म्हणतो की, आपण यावर तोडगा शोधायला हवा. कारण दुसरा पर्याय आणखीनच वाईट आहे. मात्र, करावे तर काय करावे, याचा विचार मी करत आहे."

कसे कमी होणार चीनचे वर्चस्व - आशिया खंडातील चीनचे वर्चस्व कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे, भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमचे सदस्यत्व मिळणे. भारत गेल्या अनेक दशकांपासून यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र चीन त्यात सतत्याने अडथळा निर्माण करत आहे. महत्वाचे म्हणजे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांपैकी चार सदस्यांनी भारताच्या दाव्याला पाठिंबा दिला आहे. जर भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमचे सदस्यत्व मिळाले, तर आशिया खंडातील चीनचे वर्चस्व कमी होण्यास मदत होईल.

मात्र, हे होईपर्यंत, QUAD अधिक सक्रिय झालेले नक्कीच भारताला बघायला आवडेल. क्वाड हे ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेचा एक राजनैतिक आणि लष्करी समूह आहे. याचा मुख्य उद्देश इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनचा प्रभाव आणि आक्रमकता रोखणे असा आहे.

७० वर्षीय जयशंकर म्हणाले, "या सरकारने (डोनाल्ड ट्रम्प) आपले पहिले परराष्ट्र धोरण क्वाडसह सुरू केले, हे पाहून मला आश्चर्य वाटले. क्वाडमधील सर्वात चांगली गोष्ट कोणती असे तर, त्यासाठी कोणताही खर्च नाही. प्रत्येकजण येतो, त्यांचे बिल भरतो, सर्वजण समान आहेत." 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरchinaचीनAmericaअमेरिकाIndiaभारत