कोणी नानु नथी, कोणी मोटो नथी!
By Admin | Updated: September 18, 2014 12:41 IST2014-09-18T01:56:42+5:302014-09-18T12:41:56+5:30
कोण किती जागा लढवते यावर मोठा किंवा छोटा भाऊ ठरत नाही. सरकारमधील सर्व घटकपक्षांचे महत्व समान असले पाहिजे.

कोणी नानु नथी, कोणी मोटो नथी!
मुंबई : कोण किती जागा लढवते यावर मोठा किंवा छोटा भाऊ ठरत नाही. सरकारमधील सर्व घटकपक्षांचे महत्व समान असले पाहिजे. निर्णयात सर्व पक्षांना सारखा अधिकार असला पाहिजे. ही बाब शिवसेना नेतृत्वाला स्वीकारण्यास भाग पाडण्याची भूमिका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते.
महाराष्ट्रात आतार्पयत लोकसभा निवडणुकीत भाजपा मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ राहिली तर विधानसभा निवडणुकीत मोठय़ा भावाची भूमिका शिवसेनेने निभावली हे शहा यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी (कोणी नानु-मोटो नथी!) हे लहान-मोठे चालणार नाही, असे मत व्यक्त केल्याचे समजते. राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते तेव्हा त्या सरकारचा रिमोट कंट्रोल दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होता.
भाजपाच्या निर्णयावरही ठाकरे यांचा कंट्रोल चालत असे. हे चित्र आता चालणार नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तरी भाजपाला सरकारमध्ये तेवढेच अधिकार राहतील हे शिवसेनेकडून कबुल करून घेण्याचे बैठकीत ठरले.
मोदींवर टीका नको
शिवसेनेच्या मुखपत्रतून सातत्याने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर टीका होत आहे. आजही दहा राज्यातील पोटनिवडणुकीवरून मुखपत्रत टीका आली आहे. यापुढे हे सहन करायची नाही, असेही बैठकीत ठरले.