शिवाजी पुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:13+5:302015-06-25T23:51:13+5:30

शिवाजी पुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला
>पुणे : शिवाजी पुलाच्या कमानीखालील स्लॅबचा भाग बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेमध्ये पुलाखालून जाणा-या मोटारीचे गाडीचे चेपल्याने नुकसान झाले. ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला.पुलास कोणताही धोका नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. या पुलाच्या पालिका भवनाजवळील कमानीखाली पाण्याची गळती होत असल्याने दहा वर्षांपुर्वी स्लॅबचे प्लास्टरिंग करण्यात आले आहे. या प्लास्टरचा काही भाग आज दुपारी कोसळला.नागरिकांनी अग्निशामक दलास याबाबत माहिती कळविल्यानंतर तब्बल दीड तासाने घरपडी विभागाचा एक बंब घटनास्थळी आला. पुलाचा काही भाग पडल्याची माहिती वेगाने पसरुन नागरिक घटनास्थळी येत होते. या घटनेसंदर्भात महापालिकेचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला म्हण़ाले, स्लॅबचा भाग आज अचानक दुपारी कोसळला. या घटनेमध्ये पुलाखालून जाणा-या एका गाडीचे नुकसान झाले असून या गाडीचा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला. पालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व पुलांचे स्ट्ररल ऑडीट करण्यात आले आहे. यामध्ये ११ जुन्या पुलांचा समावेश आहे. शिवाजी पुलाची गळती रोखण्यासाठी ग्रेनाईट आणि स्लॅबचा थर लावण्यात आला होता, परंतू त्यामध्ये पाणी गेल्याने स्लॅबचा काही भाग अचानक खाली आला. सुदैवाने कोणताही जिवीतहानी झालेली नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून पुलाखालील सर्व स्लॅब काढून घेण्यात आले आहेत. अचौकट पुलाचे आयुष्य संपल्याचे पत्र बेदखल शिवाजी पुलास नवा पूल असे संबोधन आहे.त्यास लवकरच शताब्दी पूर्ण होईल. ब्रिटन सरकारकडून शहरातील काही पुलांचे आयुष्य संपले असून ते तातडीने पाडावेत, असे लेखी पत्र पाठविण्यात आले होते. परंतू, त्या पत्राची दखल महानगरपालिकेकडून गांभीर्याने घेतली गेली नाही. वृत्तपत्रांतून या पुलाच्या जुनाटपणाविषयी बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर या पुलाजवळ दुस-याच वर्षात एका पुलाचे काम सुरु करण्यात आले. नंतर त्यास जयवंतराव टिळक पूल असे नाव दिले गेले.