कोरठाणला सोमवती अमावास्या उत्सव
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:35+5:302014-12-20T22:27:35+5:30
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कोरठाण खंडोबा येथे सोमवार (दि.२२) तारखेला सोमवती अमावास्या उत्सव पर्वणीचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरठाणला सोमवती अमावास्या उत्सव
अ मदनगर : पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कोरठाण खंडोबा येथे सोमवार (दि.२२) तारखेला सोमवती अमावास्या उत्सव पर्वणीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवतीच्या पर्वकाळामध्ये श्री खंडोबा भक्तांनी कुळधर्म कुलाचार करण्याची धार्मिक परंपरा आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून यात श्री खंडोबा स्वयंभु तांदळा मूर्तीला पवित्र गंगास्नान, अभिषेक पूजा करून महाआरती होणार आहे. त्यानंतर सवाद्य मिरवणूक आणि पालखी निघणार आहे. यावेळी सकाळ पासून आमटी- भाकरीचा महाप्रसाद वाटप होणार आहे. पिंपळगाव रोठा येथील विठ्ठल जाधव, कारवाडी (ता. जुन्नर) येथील तान्हाजी बेलकर यांच्यावतीने या महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. पर्वणी उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष ॲड. पांडूरंग गायकवाड, रामदास मुळे, शांताराम खोसे, बन्शी ढोमे, सरपंच वंदना झावरे यांनी केले आहे. .........................