शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गावर नवीन २१ स्थानके, रोहा ते ठोकूर ७४१ किमी मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामाने घेतला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 12:55 IST

आधुनिकतेची कास धरून अन कोकणासह सामान्य कर्नाटकी माणसाचे हित जपून कोकण रेल्वे मार्गावर लवकरच २१ नवी स्थानके अन रोहा ते ठोकूर या ७४१ किमी मार्गाचे विद्युतीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे.

- नारायण जाधवउडीपी - कोकण रेल्वे म्हटले की आठवते ती हिरव्यागर्द वनराईतून अन् डोंगर कपाऱ्या चिरत घुरांच्या रेषा काढणारी आगीनगाडी. झुक झुक आगीनगाडी धुरांचा रेंषा हवेत काढी, मामाच्या गावाला जाऊया, या गाण्याची आठवण करून देणारी रेल्वे. परंतु आता आधुनिकतेची कास धरून अन कोकणासह सामान्य कर्नाटकी माणसाचे हित जपून कोकण रेल्वे मार्गावर लवकरच २१ नवी स्थानके अन रोहा ते ठोकूर या ७४१ किमी मार्गाचे विद्युतीकरणाच्या कामाने  वेग घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर आता ३ वर्षानंतर धुरांच्या रेषा दिसणार नाहीत. दिसेल ती सुसाट धावणारी वीजे वरील रेल्वे. यामुळे नजिकच्या काळात तिच्या वेगासारखाच कोकणसह कर्नाटकचा विकासही धावेल असा विश्वास कोकण रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक मोहम्मद असीफ सुलेमान यांनी व्यक्त केला.आपल्या या महत्त्वकांक्षी कांमाचा पाहणी दौरा पत्रकारांसाठी कोकण रेल्वे ने घडवून आणला. यांत इन्नंजे स्थानकाचे काम पाहता आले. नव्या २१ स्थानकांपैकी हे एक स्थानक आहे. कर्नाटकातील उडपी नजिकच्या ६/७ गावे या स्थानकाला जोडली जाणार आहेत. उडपी ते पडबिद्री दरम्यान हे स्थानक आकार घेत आहे. सध्या येथे थांबा आहे. त्याचे ११.२४ कोटी खर्चून कायमस्वरूपी स्थानक होत आहे. कुमटा स्थानकही अशाच प्रकारे आकार घेत आहे. या नव्या २१ स्थानकांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांची संख्या ८७ होणार आहे. तसेच दोन स्थानकांमधील अंतर १२.७५ किमी वरून ८.३ इतके कमी होऊन कोकण रेल्वेचा वेगही वाढणार आहे. या २१ स्प्रथानकांच्या प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.या शिवाय केंद्र सरकारने देशांतील सर्वच रेल्वे नारिंगांचे विद्युतीकरणाचे काम घेतले आहे. त्या अंतर्गत कोकण रेल्वेवरील रोहा ते वेरना आणि वेरना ते ठोकूर अशा दोन टप्यात विद्युतीकरण करण्यात येत आहे. रोहा ते वेरनापर्यंतचे काम एल अ‍ँड टी आणि वेरना ते ठोकूर पर्यंतचे काम कल्पतरू कंपनीस देण्यात आले आहे. १११० कोटी रुपये या दोन्ही कामांवर खर्च केले जात आहेत. ३ वर्षात दोन्ही टप्यातील कामे पूर्ण करण्याचा मानस आहे. मार्गावरील दुर्गम भागांत यंत्र सामग्रीची नेआण करण्यासाठी मालवाहतूक रेल्वेची मदत घेण्यात येत आहे.नवी स्थानके विद्युतीकरणाचा मोठा लाभ कोकणात आकार घेणाऱ्या बंदरे आणि उद्योगांना होणार आहे. त्यांचा वाहतूक खर्च कमीलीचा कमी होणार आहे. शिवाय कोकण रेल्वेचा विद्युतीकरणामुळे डिझेलवरील खर्चात ३०% बचत होणार आहे.या सर्वांना पुरक म्हणून कर्नाटकातच बाली येथे सर्वात मोठा लॉजिस्टीक पार्क विकसित होत आहे. यामुळे नजिकच्या काळात कोकण रेल्वेवर कंटेनरची वाहतूक मोठ्याप्रमाणावर वाढून कोकण रेल्वेचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल असा विश्वास वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेMaharashtraमहाराष्ट्र