स्मार्ट सिटीसाठी सोलापूरची निवड होणारच : बनसोडे

By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:17+5:302015-08-14T22:54:17+5:30

सोलापूर :

Solapur will be selected for Smart City: Bansode | स्मार्ट सिटीसाठी सोलापूरची निवड होणारच : बनसोडे

स्मार्ट सिटीसाठी सोलापूरची निवड होणारच : बनसोडे

लापूर :
स्मार्ट सिटीसाठी सोलापूर शहराची निवड होणारच, असा आत्मविश्वास प्रकट करुन याबाबत प्रशासनाला सर्वतोपरी आपण सहकार्य करणार आहोत, असे खा. शरद बनसोडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सोलापूर शहराचा चेहरा-मोहरा बदलला पाहिजे. सोलापूर हे धुळीचं शहर, अतिक्रमण असलेले शहर, रस्ते दुभाजक नाहीत, रस्ते चांगले नाहीत, सर्वत्र अस्वच्छता हे किती दिवस चालणार?, असा सवाल करुन बनसोडे म्हणाले, आता प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी आणि शहरवासीयांची मानसिकता बदलली पाहिजे. सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहून शहराच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी एका पाणीपुरवठा योजनेची गरज आहे. सोलापुरात तीर्थक्षेत्रासाठी दरवर्षी लाखो लोक येतात. त्यामुळे येथे पर्यटन केंद्राची गरज आहे. यासाठी केंद्रस्तरावर आपले प्रयत्न सुरु आहेत. सोलापूर शहराचा पुढील ५० वर्षांचा आराखडा तयार केला पाहिजे आणि त्यानुसार विकासकामांना चालना दिली पाहिजे. स्मार्ट सिटीसाठी पालिका प्रशासनाने आपले योगदान द्यावे. बाहेरचे लोक सोलापुरात आले तर काय शहर स्मार्ट आहे, असा शब्द त्यांच्या तोंडून निघावा. माझ्या हाताला यश आहे. मी स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करणारच. कोणताही उद्योग-व्यवसाय आणताना त्याचा करेरा होणार नाही. कुदळ मारली की उद्योग उभारला पाहिजे, असे आपले ध्येय आहे, असे बनसोडे म्हणाले.
इन्फो
स्मार्ट सिटीच्या पहिल्या परीक्षेत आपण पास झालो आहोत. आता प्रतीक्षा केंद्राच्या परीक्षेत पास होण्याची. यासाठी प्रशासनाच्या वतीने जे काही सादरीकरण करावयाचे आहे, ते उत्तम प्रकारे आणि सक्षमपणे केले जाईल. सोलापूर स्मार्ट सिटी व्हावं, हे आपलं स्वप्न आहे आणि ते आपल्या कारकिर्दीत आपण पूर्ण करु, असे मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यानिमित्ताने म्हणाले.

Web Title: Solapur will be selected for Smart City: Bansode