सोलापूरचा संघ अव्वल राज्य ओकिनावा कराटे स्पर्धा: 60 सुवर्ण, 54 रौप्य, 105 कांस्यपदकांसह एकूण 216 पदकांची कमाई

By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:34+5:302014-10-04T22:55:34+5:30

सोलापूर:

Solapur team's top state Okinawa karate competition: 60 gold, 54 silver, 105 bronze medals, total 216 medals | सोलापूरचा संघ अव्वल राज्य ओकिनावा कराटे स्पर्धा: 60 सुवर्ण, 54 रौप्य, 105 कांस्यपदकांसह एकूण 216 पदकांची कमाई

सोलापूरचा संघ अव्वल राज्य ओकिनावा कराटे स्पर्धा: 60 सुवर्ण, 54 रौप्य, 105 कांस्यपदकांसह एकूण 216 पदकांची कमाई

लापूर:
नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे झालेल्या 18 व्या राज्य ओकिनावा कराटे स्पर्धेत यजमान सोलापूरच्या संघाने एकूण 219 पदकांसह अव्वल स्थान पटकावल़े अहमदनगर द्वितीय तर सातार्‍याच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला़
सोलापूरच्या संघात शिवस्मारक, इंडियन मॉडेल स्कूल, शिवदासमय, शेळगी, तळवलकर जिम, क़ेएल़ई़ स्कूल, दमाणीनगर, होटगी रोड, हिरज, बी़सी़ होस्टेल, मोहोळ या दहा केंद्रातील कराटेपटूंनी 60 सुवर्ण, 54 रौप्य आणि 105 कांस्यपदक अशाप्रकारे एकूण 219 पदकांची कमाई केली़
सवरेत्कृष्ट संघाचा नागेश करजगी चषक भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष प्रसन्न तानवडे, स्वामी नारायण गुरुकुलचे प्राचार्य भंडारे यांच्या हस्ते सोलापूरच्या संघाला प्रदान करण्यात आला़
काता, कुमिते व वेपन काता अशा तीन प्रकारातील या स्पर्धेत 12 जिल्?ातील 400 खेळाडूंनी सहभाग नोंदविला़
टेक्निकल डायरेक्टर सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील विजयी स्पर्धकांना संगीता जाधव, अशोक जाधव, प्रभुराज भिमदे, शिवशरण वाणीपरीट, दशरथ काळे, महिर जाधव, राजू हक्के, प्राजक्ता राजेपांढरे, दीप्ती घोडके, संजय साबळे यांनी प्रशिक्षण दिल़े
प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन उद्योगपती दामोदर दरगड व कुमार करजगी यांच्या हस्ते झाल़े
विजयी खेळाडू:
सुवर्णमती प्रजापती, गंगासागर, किरीट कोरडे, अविनाश भराडिया, अथर्व चव्हाण, संकेत धननाईक, सिद्धांत रेवणकर, विद्यासागर जाधव, तपस्या कोंडेवार, वैष्णवी बोंडगे, सलोनी चिपडे, साईशा चिपडे, वीरा वालेच्छा, शाहिबाज शेख, मयुरी बोंडग़े
रौप्य: सिद्धार्थ पाठक, यश शेंडगे, सिद्धार्थ आसावा, कौस्तुभ आबुटा, साक्षी तोरणगी, पूजा घाडगे, निदा शेख, हितेश भराडिया, सर्वेश कटाऱे
कांस्य ईशना राठी, खुशी मंगरुळे, संयुक्ता चव्हाण, नताशा चव्हाण, र्शद्धा घाडगे, कनक जामवार, अमेय कटारे, रोहित मंगळवेढेकर, संकेत कदम़

Web Title: Solapur team's top state Okinawa karate competition: 60 gold, 54 silver, 105 bronze medals, total 216 medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.