शेतकऱ्यांसाठी आता मृदा स्वास्थ्य योजना
By Admin | Updated: February 20, 2015 02:16 IST2015-02-20T02:16:47+5:302015-02-20T02:16:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांसाठी ‘मृदा स्वास्थ्य कार्ड’ (सॉईल हेल्थ कार्ड) योजनेचे येथे उद्घाटन केले.

शेतकऱ्यांसाठी आता मृदा स्वास्थ्य योजना
सुरतगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांसाठी ‘मृदा स्वास्थ्य कार्ड’ (सॉईल हेल्थ कार्ड) योजनेचे येथे उद्घाटन केले. शेतजमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी ही योजना असून खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत बिघडू नये यासाठी खबदारी घेतली जाणार आहे. येत्या तीन वर्षांत सुमारे १४ कोटी शेतकऱ्यांना या कार्डचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
खतांच्या अत्याधिक वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असल्याकडे मोदींनी लक्ष वेधले.
जमिनीची तपासणी करण्यासाठी या कार्डचा वापर करता येईल. पंतप्रधानांनी नव्याने स्थापन झालेला निती आयोग व राज्य सरकारांनी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी उच्चाधिकार तज्ज्ञ समितींची स्थापना करण्याचे आवाहनही केले. (वृत्तसंस्था)