शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sohrabuddin Sheikh case : सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 13:55 IST

Sohrabuddin Sheikh case : सोहराबुद्दीन कथित चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे

ठळक मुद्देषड़यंत्र आणि हत्येचा गुन्हा सिद्ध करण्यास पुरावे पर्याप्त नव्हेत - न्यायालय पुराव्यांअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता

मुंबई -  सोहराबुद्दीन कथित चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं हा निकाल दिला आहे.  सरकारी पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यानं आरोपींना या प्रकरणातून मुक्त करण्यात येत असल्याचं न्यायालयानं म्हटले. साक्षीदारांनी आपला जबाब फिरवण्यावर तसंच जबाब न देण्यावर न्यायालयानं म्हटलं की, जर कोणीही जबाब देत नसेल तर यामध्ये पोलिसांचा दोष नाही. 

न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं की, साक्षीदार-पुराव्यांद्वारे हत्या आणि कट सिद्ध करण्यास परिस्थितीजन्य पुरावे देखील मिळालेले नव्हते. न्यायालयानुसार 'तुलसीराम प्रजापति यांची एका षड़यंत्रातून हत्या करण्यात आली, हादेखील आरोप योग्य नाहीय'. न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं की, साक्षीदार-पुराव्यांद्वारे हत्या आणि कट सिद्ध करण्यास परिस्थितीजन्य पुरावे देखील मिळालेले नव्हते. न्यायालयानुसार 'तुलसीराम प्रजापतिचीही षड़यंत्रातून हत्या करण्यात आली, हादेखील आरोप योग्य नाहीय'. 

नेमके काय आहे प्रकरण?गुजरात एटीएस आणि राजस्थान एसटीएफनं 26 नोव्हेंबर 2005 रोजी अहमदाबादजवळ एका चकमकीत सोहराबुद्दीन शेख आणि त्याच्या पत्नीला ठार केले होते. यानंतर एका वर्षानंतर 28 डिसेंबर 2006 रोजी या खटल्यातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुलसीराम प्रजापती याची हत्या करण्यात आली.  त्यालाही कथित चकमकीतच ठार करण्यात आल्याचा आरोप आहे. 2010 पासून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. 2012 मध्ये या प्रकरणाचा खटला मुंबई न्यायालयात वर्ग करण्यात आला.   यानंतर खटल्याची निष्पक्ष सुनावणी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयानं गुजरातमधील हे प्रकरण महाराष्ट्रातील न्यायालयात वर्ग केले.

सरकारी वकिलांनी न्यायालयात 210 साक्षीदारांची साक्ष नोंदविली, त्यापैकी 92 साक्षीदार ‘फितूर’ जाहीर करण्यात आले. 

 

 

 

टॅग्स :Sohrabuddin Sheikh encounter caseसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणCBIगुन्हा अन्वेषण विभागGujaratगुजरात