शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोहराबुद्दीन शेख चकमक : अमित शहा गोत्यात येणार? सीबीआयविरोधात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 19:53 IST

अमित शहा यांना आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान न दिल्याने सीबीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई: सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सीबीआयविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अमित शहा यांना या खटल्यातून आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान न दिल्याने सीबीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वकिलांच्या एका संघटनेच्या वतीने मुंबई हायकोर्टात शुक्रवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. हायकोर्टानेच सीबीआयला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. या याचिकेवर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते वकील अहमद आबिदी यांनी सांगितलं. गुजरातमधील या बहुचर्चित प्रकरणात शहा यांच्याशिवाय गुजरात पोलिसांच्याही अनेक अधिका-यांची नावं समोर आली होती. कनिष्ठ न्यायालयाने अमित शहा यांना या खटल्यातून आरोपमुक्त केले आहे पण सीबीआयने त्याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची अपेक्षा असताना सीबीआयने त्या निर्णयाला आव्हान दिले नाही, त्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण -- सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी हैदराबादहून महाराष्ट्रातील सांगली येथे जात असताना अपहरण झाले होते. एटीएसने हे अपहरण केल्याची चर्चा होती.- सोहराबुद्दीन शेख याचे पाकिस्तान येथील लश्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंध होते असा त्यावेळी दावा करण्यात आला होता. - नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले. तसेच त्याची बायको त्यानंतर गायब झाली होती. तिलाही मारण्यात आल्याचे बोलले जात होते. - या घटनेच्या वेळी अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते. या दोन्ही बनावट चकमकींत अमित शहा हे सहभागी असल्याचा आरोप होता. याप्रकरणी सीबीआयने त्यांना जुलै 2010 मध्ये अटकही केली होती. - त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता.- डिसेंबर 2014  मध्ये न्यायालयाने अमित शहा यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले होते. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहSohrabuddin Sheikh encounter caseसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणCBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरण