शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचं ऐतिहासिक पाऊल! 'चांद्रयान 2' मध्यरात्री चंद्रावर उतरणार; अनेक रहस्य उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 09:52 IST

चांद्रयान 2 च्या माध्यमातून चंद्रावरील अनेक गुढ रहस्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न होणार आहे.

नवी दिल्ली - चंद्र कसा बनला आहे? चंद्रात बदल का होतो? चंद्रावरील अनेक रहस्यांचा उलगडा कधी होणार? चंद्रावर पाणी आहे, असलं तर किती आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काळात चांद्रयान 2 आपल्याला देणार आहे. चांद्रयान 2 हे भारताचं स्वप्न आज मध्यरात्री पूर्ण होणार आहे. मध्यरात्री 1.30 ते 2.30 च्या दरम्यान चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. चंद्राच्या साउथ पोलमध्ये ही लँडिंग होईल. आजतागायत याठिकाणी कोणताही देश पोहचला नाही. 

चांद्रयान 2 च्या माध्यमातून चंद्रावरील अनेक गुढ रहस्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न होणार आहे. यातून भविष्यात चंद्रावरील अभियानात नेमके कोणते बदल करणे गरजेचे आहे अथवा कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा याचंही निरीक्षण केलं जाणार आहे. पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा उपग्रह चंद्र आहे. जर या उपग्रहाची माहिती मिळाली तर अंतराळातील रहस्य शोधणं सोपं होईल. 

तुम्हीही होऊ शकता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार इस्त्रोच्या अधिकृत वेबसाइटवर चांद्रयान 2 लँडिंगचे लाइव्ह स्ट्रीमिंग दाखविण्यात येईल. प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(PIB) च्या यू-ट्युब पेजवरून लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवलं जाईल. दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर याचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल 

चंद्रावरील पाण्याबाबत मिळणार उपयुक्त माहितीचंद्र कसा बनला आणि विकसित झाला याची काही माहिती उपलब्ध आहे. मात्र चंद्राची उत्पतीबाबत आणखी जास्त माहिती घेणे गरजेचे आहे. चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे चांद्रयान 1 ने मिळविले होते आता चांद्रयान 2 चा उद्देश चंद्रावरील एकूण भागात किती आणि कुठे कुठे पाणी आहे? या भागात खनिज आहे का? कोणते डोंगर आहेत का? तेथील मातीची विशेषता काय? चंद्रावर भूकंप होतो का? अशी माहिती शोधली जाणार आहे. 

चांद्रयान 2 चे वैशिष्ट काय?पहिलं अंतरिक्ष मिशन आहे जे चंद्राच्या मागील बाजूस उतरणार आहेपहिला भारतीय अभियान आहे. स्वत:च्या तंत्रज्ञानावर चंद्रावर उतरणार आहेदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे चंद्रावरील माहिती शोधणार आहे. अमेरिका, रूस आणि चीननंतर भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश आहे. या योजनेसाठी 978 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

दरम्यान चांद्रयान 2 चंद्राच्या मागील बाजूस उतरणार आहे ज्याठिकाणी अंधार असतो. चंद्राच्या दर्शनी भागात सर्वात जास्त पाणी असल्याचे संकेत आहेत. तसेच सौर मंडळाची सुरुवात या अंश क्षेत्रापासून होते. चांद्रयान 2 चे विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोवर हे चंद्रवरील दोन खड्ड्याच्या मध्ये उतरणार आहे.   

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2Indiaभारत