शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

समाजवादी ‘डोंगर म्हातारा झाला’

By admin | Updated: February 16, 2017 00:50 IST

पंतप्रधान मोदी व बसपाच्या मायावती यांच्यासह सर्वच विरोधकांनी येथील समरांगणात समाजवादी आणि काँग्रेसची तरुण पिढी मुख्य स्पर्धेत आहे

सुरेश भटेवरा / इटावापंतप्रधान मोदी व बसपाच्या मायावती यांच्यासह सर्वच विरोधकांनी येथील समरांगणात समाजवादी आणि काँग्रेसची तरुण पिढी मुख्य स्पर्धेत आहे, ही बाब मान्य केली आहे. अमित शाहसह भाजपचे अन्य प्रचारकांच्या हल्ल्याचा रोखही अखिलेश व राहुल गांधींवर आहे. कौटुंबिक अंतर्कलहाच्या संदिग्ध वातावरणात अखिलेशना राहुल गांधींची साथ मिळाली. सारे चित्रच बदलून गेले. सपात अचानक जोश संचारला. मरगळलेल्या काँग्रेसजनांच्या आशेला पालवी फुटली. पण पंचाईत झाली ती मुलायमसिंगांची. शनिवारी पहिल्या टप्प्याचे अन् बुधवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाले. गोंधळलेल्या मुलायमसिंगांना मात्र भाऊ शिवपाल यादव व मुलगा अखिलेश यापैकी कोणाच्या पाठिशी उभे रहावे, हा पेच अद्याप सोडवता आलेला नाही.राजकीय मजबुरीमुळे अखिलेशचे समर्थक नेताजींचे नाव आदराने घेतात. मात्र स्वत:ला डॉ. राममनोहर लोहियांचा शिष्य मानणाऱ्या मुलायमसिंगांच्या व्यक्तिमत्वाचा डोंगर म्हातारा झाला आहे, याची जाणीव सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसते आहे.इटावाच्या जसवंतनगरात शिवपाल उमेदवार आहेत. अखिलेशशी त्यांचे पराकोटीचे वैर. तिथे बंधू शिवपालच्या सभेत, सपातील सारे चढउतार नमूद करताना, चौधरी चरणसिंग, कर्पुरी ठाकुर, जनेश्वर मिश्रांसारख्या दिवंगत नेत्यांचे दाखले देत काहीशा असहाय मन:स्थितीत मुलायमसिंग बोलले... ‘‘मुलगा आणि भाऊ दोघेही माझेच. सरकारही मीच उभ्या केलेल्या सपाचे. अशा स्थितीत तुम्हीच मला सांगा, मी काय करू? जनहिताच्या कामांसाठी मलाही आपल्याच सरकारवर अनेकदा दबाव आणावा लागला. याच जसवंतनगराने मला सात वेळा निवडून दिले, देशात राजकारणाच्या शिखरावर पोहोचवले. स्वकियांनी दगाबाजी केली नसती, तर कदाचित पंतप्रधान झालो असतो. (मग मध्येच थांबून) एक प्रकारे बरेच झाले की मी पंतप्रधान झालो नाही, अन्यथा आज माजी पंतप्रधानांच्या रांगेत कुठेतरी बसलेलो दिसलो असतो अन् बहुदा राजकीय रणांगणातूूनही बाहेर पडावे लागले असते. (श्रोत्यांमधे हास्याची करूण लकेर) काही अप्रिय प्रसंगांना तोंड देण्याची वेळ येते. मात्र तुम्हाला मी एकच आवाहन करीन की राजकारणात काहीही झाले तरी खंबीर मनाने एकजूट कायम ठेवा. शिवपालला इतक्या विक्रमी मतांनी विजयी करा की विरोधकांच्या अनामत रकमा जप्त झाल्या पाहिजेत. मुलायमसिंग म्हणतात : ‘मतदारसंघातील समस्या व विकासाशी शिवपाल इतका एकरूप झालेला आहे की, कोणत्याही नेत्याला या तुलनेचे काम उभे करता आलेले नाही.’