सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड गोत्यात
By Admin | Updated: February 12, 2015 15:41 IST2015-02-12T15:38:13+5:302015-02-12T15:41:31+5:30
गुजरात दंगलपीडितांसाठी जमा केलेला निधी हडप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड या गोत्यात आल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड गोत्यात
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद/मुंबई, दि. १२ - गुजरात दंगल पीडितांसाठी जमा केलेला निधी हडप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड या गोत्यात आल्या आहेत. गुजरात हायकोर्टाने सेटलवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून त्यांना अटक करण्यासाठी गुजरात पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मात्र तिस्ता सेटलवाड त्यांच्या निवासस्थानी नसल्याने पोलिसांना रिकाम्या हातीच परतावे लागले.
गुजरात दंगलीतील पीडितांसाठी तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांनी गुलबर्ग सोसायटीची स्थापना केली. गुजरातमधील गुलबर्ग या दंगलग्रस्त भागातील मृतांच्या स्मरणार्थ स्मृती स्थळ उभारण्यासाठी तिस्ता सेटलवाड यांनी कोट्यावधीचा निधी जमा केला. यातील सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी तिस्ता सेटलवाड व अन्य आरोपींनी हडपल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तिस्ता सेटलवाड यांनी गुजरात हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र गुरुवारी हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. हायकोर्टाने अर्ज फेटाळल्याने सेटलवाड यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हायकोर्टाने अर्ज फेटाळताच गुजरात क्राईम ब्रँचच्या पथकाने मुंबईतील जुहू येथील निवासस्थानी धडक दिली. मात्र पोलिस येण्यापूर्वीच सेटलवाड घरातून निघून गेल्या होत्या. यामुळे पोलिसांना रिकाम्या हातीच परतावे लागले.
सेटलवाड यांनी गुजरात दंगलीतील पीडितांसाठी कायदेशीर लढा दिला असून दंगलीसंदर्भात गुजरात सरकारच्या भूमिकेवर त्यांनी जोरदार टीका केली होती. मात्र या खटल्यामागे राजकीय कारण असून मी निर्दोष असल्याचा दावा सेटलवाड यांनी केला होता. दरम्यान, तिस्ता सेटलवाड यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज